vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला श्रीरामनवमीच्या शुभेच्छा प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श घेऊन समाजात सौहार्दतेसह सहिष्णुतेची मूल्ये बळकट करूया – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला श्रीरामनवमीच्या शुभेच्छा, प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श घेऊन समाजात सौहार्दतेसह सहिष्णुतेची मूल्ये बळकट करूया – उपमुख्यमंत्री अजित पवार…

 

राज्य प्रतिनिधी- मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या आदर्शमय जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात सौहार्द, सहिष्णुता आणि सत्याची मूल्ये अधिक बळकट करण्याचे आवाहन करीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामनवमीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, “श्रीराम नवमी हा मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या जन्माचा उत्सव असून, हा दिवस त्यांच्या आदर्श जीवनमूल्यांची आठवण करून देतो. श्रीरामांनी दाखवलेली प्रजाहितदक्षता, सत्यनिष्ठा आणि निःस्वार्थ सेवा ही आजही आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतात. त्यांच्या जीवनातून आपण एकता, शांती आणि समरसतेची शिकवण घेणे आवश्यक आहे. श्रीरामनवमीचा उत्सव सर्वांनी शांततेत, उत्साहात, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि सलोख्याने साजरा करावा,” असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार केले प्रभू श्रीरामांच्या चरणी वंदन केले आहे.

संबंधित पोस्ट

१४० किलोमीटर समुद्र किनाऱ्याच्या सरंक्षणाची जबाबदारी रत्नागिरीकरांची – पालकमंत्री डॉ. उदय सामंत सुरक्षित तटम् समृद्ध भारत ; सीआयएसएफ वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन

vishwatmaklokswamivarta

राज्यात अनधिकृत कत्तलखान्यातील गोहत्या बंदीसाठी विशेष मोहीम- गृहराज्यमंत्री योगेश कदम..

एमआयडीसीतील निष्क्रिय भूखंड काढून घेणार – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत उद्योगस्नेही धोरण व दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटिबद्ध

नवीकरणीय ऊर्जाधारित शहरी प्रशासनातील उत्कृष्टता पुरस्कारा’ने नवी मुंबईचा राज्यस्तरीय गौरव

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची कार्यवाही सुरळीत सुरु;अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विजयसिंह देशमुख यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

15 ते 18 मे कालावधीत जिल्ह्यात यलो अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*