vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

फळपीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी 25 एप्रिल पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी..

फळपीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी 25 एप्रिल पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी..

 

 सांगली, प्रतिनिधी : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतक‌ऱ्यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे, परंतु फळपिकांची ई-पिक पाहणी डीजीटन क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल ॲपद्वारे केलेली नाही त्यांनी दि. 25 एप्रिल पर्यंत ई-पिक पाहणी पूर्ण करावी. अन्यथा दि. 12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार ई-पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना दि. 12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये सांगली जिल्ह्यात बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी, यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. याः विमा कंपनीमार्फत आंबिया बहार सन 2024-25 मध्ये सांगली जिल्ह्यात द्राक्ष, केळी, डाळिंब, आंबा या फळ पिकांसाठी हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2025-26 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

कल्याण मधील बळीत मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

तीन महिन्यांचे धान्य एकत्र वाटप; ई-पॉस यंत्रणेबाबत अडचणी दूर करण्यासाठी निर्णय

vishwatmaklokswamivarta

विमुक्त आणि भटक्या जमातींना मिळणार अधिकृत ओळखपत्र

vishwatmaklokswamivarta

तामिळनाडूतील पेरियार विद्यापिठाच्या कुलपतींकडून ऐरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाची प्रशंसा..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

vishwatmaklokswamivarta