vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

तलाव मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित

तलाव मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित

 

बुलडाणा, प्रतिनिधी: शासनाने सुधारीत तलाव, जलाशय धोरण जाहिर केलेले आहे. त्यानुसार सन 2025-26 वर्षाकरिता, बुलढाणा जिल्ह्यातील 500 हेक्टर खालील कोराडी 367 हेक्टर तलावाच्या निर्धारित कार्यक्षेत्रातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना शासन निर्णय, अटी व शर्तीचे अधिन जिल्हास्तरीय तलाव ठेका समितीचे मान्यतेने तलाव मासेमारी ठेक्याने देण्यात येणार आहे.

अटी-शर्ती : संस्थेचा विहीत नमुन्यातील मागणी अर्ज (तलाव ठेका नमुना-१), तलाव ठेका मागणीबाबतचा संस्थेचा ठराव व अर्ज, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), बुलढाणा यांचे संस्था नोंदणी नाहरकत प्रमाणपत्र/उपविधी नाहरकरत प्रमाणपत्र तसेच संस्था नोंदणी प्रमाणपत्र व उपविधी पृष्ठाची सत्यप्रत व ९७ वी घटना दुरुस्तीची प्रत, सहाय्यक निबंधक (दुग्ध), बुलढाणा यांचे संस्था कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), बुलढाणा यांचे संस्था थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र, संचालक मंडळाची यादी, लेखापरिक्षण अहवाल (मागील तीन वर्षाचा सन २०२२-२३, सन २०२३-२४ व सन २०२४-२५), संस्थेचे मागील तीन वर्षाचे बॅक स्टेटमेन्ट, मागील तीन वर्षाचा नफा तोटा पत्रक, प्रतिवर्ष मत्स्यबीज संचयन व मत्स्योत्पादन अहवाल.(मागील ५ वर्षे तलाव ठेका कालावधीचा), संस्थेची इतर माहिती दर्शविणारा अहवाल (जसे किसान क्रेडीट कार्ड, अपघातगट विमा, ई-श्रम कार्ड, NFDP इत्यादी) १२) १०% मत्स्यबीज संचयनाचा अगाऊ रक्कमेचा धनादेश, एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सभासद नसल्याचे प्रमाणपत्र, हमीपत्र या अटी-शर्तींची पुर्तता तलाव, जलाशयावर नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना करणे बंधनकारक आहे.

शासन निर्णय कृषी व पदुम विभाग दि. 3 जुलै 2019 मधील तरतूदी व अटी शर्तीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाचे तलाव ठेका मुदत संपुष्टात आलेले तलाव नव्याने मासेमारी ठेक्याने देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. याबाबत सविस्तर तपशील शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), बुलढाणा कार्यालयाचे नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), बुलढाणा कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

0000000

संबंधित पोस्ट

२५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत छत्तीसगड राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन संपन्न!येत्या विधानसभेत लवकरच कठोर धर्मांतरविरोधी कायदा लागू करू ! – छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन

vishwatmaklokswamivarta

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

जलसाक्षरतेसाठी लोकचळवळ आवश्यक – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील• जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप

vishwatmaklokswamivarta

येत्या ऑलिम्पिक मोहिमेसाठी आतापासूनच महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाची ‘स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंट’ तयार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना-शासनास जमिन विक्री करू इच्छिणाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन