vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत जलसंपदा विभागामार्फत कृत्रिम बुध्दीमत्ता प्रशिक्षण 

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत जलसंपदा विभागामार्फत कृत्रिम बुध्दीमत्ता प्रशिक्षण

 

 सांगली, प्रतिनिधी: कृत्रिम बुध्दीमत्ता (AI) या नवीन तंत्राज्ञानाचा वापर योग्य पध्दतीने केला तर किमान संसाधनात जास्तीत जास्त परिणाम मिळू शकतो व प्रशासनात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करुन प्रशासन अधिक गतिमान व कार्यक्षम करणेचे शक्य आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग विभागामार्फत “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” अंतर्गत कृत्रिम बुध्दीमत्तेचा शासकीय कामकाजात वापर या विषयी पाटबंधारे भवन सांगली येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाकरीता वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली च्या प्रा. डॉ. शर्वरी सोलापुरे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

या प्रशिक्षणास सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता सर्वश्री रोहित कोरे, महेश रासनकर, अमर सुर्यवंशी, उपअभियंता मोहन गळंगे, बाबासाहेब पाटील, मनोज कर्नाळे, शिवाजी पाटील, राकेश बन्ने, शर्वरी पवार, सचिन नाईक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 या प्रशिक्षणामध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा शासकीय कामकाजात वापर व त्याचा भविष्यकाळात होणारे लाभ याबद्दल प्रा. डॉ. शर्वरी सोलापुरे यांनी मार्गदर्शन केले. प्रशासनात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सल, पॉवरपॉईंट, आऊटलुक यामध्ये कसा करता येईल याबाबतचे प्रशिक्षण दिले. त्याचबरोबर Chat GPT या तंत्रज्ञानाबाबत प्रा. सोलापुरे यांनी माहिती दिली.

या कार्यक्रमाचे नियोजन टेंभू विभागाचे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरुगडे यांनी केले.

00000

संबंधित पोस्ट

गॅस सिलेंडर डिलीव्हरी करणाऱ्या व्यक्तींनी अतिरिक्त पैसे मागितल्यास कारवाई करण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवाव – जिल्हाधिकारी अशोक काकडे

एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· डिझेल बचतीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन· आगारनिहाय उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

छठ पूजेनंतर प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी भारतीय रेल्वे सज्ज, सणासुदीनंतर कामाच्या ठिकाणी परतणाऱ्या प्रवाशांकरता 6,181 विशेष गाड्या

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे नियत वयोमानानुसार दि.31 जुलै 2025 रोजी सेवानिवृत

एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीसह, एक लाख रोजगार संधी आणणाऱ्या प्रकल्पांना मान्यता…