vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दिव्यांग उमेदवारांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र अनिवार्य १ मे २०२५ पासून नव्या अटींची अंमलबजावणी..

दिव्यांग उमेदवारांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र अनिवार्य १ मे २०२५ पासून नव्या अटींची अंमलबजावणी..

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने २७ जून २०२४ रोजीच्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व दिव्यांग उमेदवारांना केंद्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवरून वितरित होणारे दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व भरती प्रक्रियेत १ मे २०२५ पासून करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीत दिव्यांग उमेदवारांसाठी त्यांच्या खात्यात युडीआयडी कार्ड क्रमांक नोंदविण्याची व त्यास स्वावलंबन पोर्टलवरून वैधता (Validation) मिळविण्याची सुविधा आधीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उमेदवारांकडे जर स्वावलंबन पोर्टलचे दिव्यांग प्रमाणपत्र आणि युडीआयडी कार्ड दोन्ही असतील, तर ते तपशील खात्यात नोंदवणे अनिवार्य आहे. ज्या उमेदवारांकडे सद्यस्थितीत स्वावलंबन पोर्टलवरुन वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र नाही. तथापि राज्य शासनाच्या एसएडीएम पोर्टलवरुन वितरित करण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र आहे. अशा उमेदवारांनी एसएडीएम प्रमाणपत्रासह वैश्विक ओळखपत्रासाठी नोंदणी केल्याचा क्रमांक (Enrolment Number) अनिवार्य असेल तथापि उमेदवारांना मुलाखतीपूर्वी वैश्विक ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल.

उमेदवाराचे नाव, दिव्यांगत्वाचा प्रकार, स्थिती इत्यादी तपशील पडताळल्यानंतरच माहिती वैध ठरवली जाईल. खात्यातील आणि युडीआयडी कार्डवरील जन्मदिनांक एकसारखे असणे आवश्यक आहे.

कोणत्याही जाहिरातीसाठी अर्ज करताना दिव्यांग तपशील वैध असल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे सर्व दिव्यांग उमेदवारांनी ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.

000000

००००००

संबंधित पोस्ट

श्रीक्षेत्र तुळजापूर येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ व धार्मिक संघटना यांची एकमुखी मागणी !तुळजापूर येथील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याप्रकरणी तत्काळ शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा ! जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी स्थानिक संघटना व ग्रामस्थ यांची बैठक बोलवावी !

धुळे व नंदुरबार जिल्हे भविष्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरपूरला स्व. तपनभाई पटेल मेमोरिअल हॉस्पिटलसह विविध विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नमुंमपा जिल्हा स्तरीय शालेय जलतरण स्पर्धेला आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते उत्साहात प्रारंभ राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नामांकित जलतरणपटू श्री शुभम वनमाळी यांची विशेष उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रदर्शनाचे उद्घाटन… जिल्हा प्रशासनाद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची विविध माध्यमांद्वारे प्रचार-प्रसिद्धी मोहीम सुरु

मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार• एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था विकसित करण्यासाठी 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची बांधिलकी..

सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि समाजसेवकांचा सन्मान