vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मित्रच्या नियामक मंडळाची दुसरी बैठक सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी नवीन साठवण तलाव बांधावेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मित्रच्या नियामक मंडळाची दुसरी बैठक सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी नवीन साठवण तलाव बांधावेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी – कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मोठ्या धरणाच्या पाणलोट (कॅचमेन्ट) क्षेत्राबाहेरील लघु पाटबंधारे प्रकल्पांचे खोलीकरण करण्याचे व नवीन साठवण तलाव बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
महाराष्ट्र इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन – ‘मित्र’ या संस्थेच्या नियामक मंडळाची दुसरी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी नियामक मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार राणा जगजीतसिंह, राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा ‘मित्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर होण्यासाठी आवश्यक धोरणे तयार करण्यासाठी उपाययोजना संदर्भात श्री. परदेशी यांनी यावेळी सादरीकरण केले. तसेच महास्ट्राईड प्रकल्प, महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास प्रकल्प आदींचा आढावा घेण्यात आला. केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाला सादर करावयाच्या प्राथमिक प्रकल्प अहवालच्या मानक कार्य प्रणालीला(एसओपी) यावेळी मान्यता देण्यात आली.
जागतिक बँक आणि बाह्य सहाय्यद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या ‘एसओपी’मध्ये दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमाप्रमाणे सादरीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी दरवर्षी राज्याचे सकल उत्पन्न (जीडीपी) 14.5 टक्के करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात राज्य आधार सामग्री प्राधिकरण (स्टेट डेटा पॉलिसी) मधून साधन सामग्री तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार
शासकीय कामकाजात गतिमानता येण्यासाठी तसेच अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी मित्र संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत युनिर्व्हसल ‘ए आय’ विद्यापीठाशी सामंजस्य करार केला. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा शासकीय कामकाजात वापर वाढविण्यासाठी मित्र व भारतीय प्राद्यौगिक संस्था, मुंबई (आयआयटी मुंबई ), वोआरजीपीडिया यासंस्थेबरोबरही सामंजस्य करार झाला.
0000

संबंधित पोस्ट

मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल, मला या प्रेमातच राहायचे आहे! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र देहू देवस्थान समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जगदगुरू तुकाराम महाराज पुरस्कार’  

कोलवड येथे कृषी ड्रोन प्रात्यक्षिक जनजागृती शिबिर

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

काशीद समुद्रकिनारी पुन्हा दोन पर्यटकांचे प्राण वाचवण्यात यश…

पुण्यातून मोठी बातमी पुणे एटीएसची मोठी कारवाई; पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जणांची चौकशी.