vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उन्हाळी क्रीडा कौशल्य प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन जास्तीत जास्त खेळाडूंनी शिबिरात सहभाग घ्यावा

उन्हाळी क्रीडा कौशल्य प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन जास्तीत जास्त खेळाडूंनी शिबिरात सहभाग घ्यावा

रायगड प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणांतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने निर्देशित केल्यानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांचे अधिपत्याखालील असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या ठिकाणी उन्हाळी सुटीचा सदुपयोग होण्यासाठी विद्यार्थी खेळाडूंसाठी विनामूल्य उन्हाळी क्रीडा कौशल्य व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात येत असून शाळेतील जास्तीत जास्त खेळाडूंनी या शिबिरात सहभाग घ्यावा व आपले प्रवेश अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अलिबाग येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी केले आहे.

 दिनांक-30 एप्रिल, 2025 पूर्वी प्रवेश घेणाऱ्या प्रथम 100 प्रशिक्षणार्थीना टी-शर्ट शार्टस दिले जाणार आहेत. उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :- शिबिर आयोजक-जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परीषद, रायगड, शिबिराचा कालावधी-01 ते 31 मे, 2025, शिबिराची वेळ-सकाळी 7.00 ते 9.00 सायंकाळी 4.00 ते 7.00, खेळाडूंचा वयोगट-8ते 16वर्षे मुले व मुली, शिबिराचे ठिकाण-जिल्हा क्रीडा संकुल.

शिबिरातील समाविष्ट खेळ-बॅडमिंटन, टेबलटेनिस, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, जिम्नॅस्टिक्स, रोप मल्लखांब, बॉक्सिंग, कराटे, तायक्वाँदो, हॅण्डबॉल, किक बॉक्सिंग.

शिबिराचे वैशिष्ट्ये-अनुभवी तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन. व्यक्तिमत्व शिबिरांतर्गत खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविणे, सामुहिक कार्य व सहकार्य, नेतृत्वगुण निर्माण करणे, संवाद साधणे, सार्वजनिक बोलणे, भावनिक बुध्दिमत्ता आणि सहानुभूती तसेच उद्दिष्ट निर्धारण आणि वेळ व्यवस्थापन या आणि अश्या अनेक विषयांची माहिती व्हावी आणि त्यातून खेळाडूचे एक चांगले व्यक्तिमत्व तयार व्हावे हे ह्या शिबिराचे प्रमुख उद्दिष्टे असणार आहे. खेळामधून मनोरंजन व मनोरंजनातून खेळाची आवड निर्माण करणे.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक-8369643502/7738051502/9158035276/8788279534/ 9960702510.

0000000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सुचना प्रौद्योगीकी संस्थान येथे मंगळवारी (दि.१६) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

बदनापूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्दमुलांच्या शासकीय निवासी शाळेतील प्रवेश सुरु..

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर आता मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला

vishwatmaklokswamivarta

अपघाती मृत्यू रोखण्यावर भर द्यावा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पदोन्नत अधिकाऱ्यांचा पद अलंकरण सोहळा

27 ते 30 सप्टेंबर कालावधीत पाठ्यपुस्तक मंडळांची सर्व व्यवहार बंद

vishwatmaklokswamivarta

सांगलीत शुक्रवारपासून तीनदिवसीय फळ महोत्सव

vishwatmaklokswamivarta