vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे नी  कवठेएकंदच्या रेशीम धागा निर्मिती केंद्राची पाहणी केली

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे नी  कवठेएकंदच्या रेशीम धागा निर्मिती केंद्राची पाहणी केली

        सांगली, प्रतिनिधी : तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील रेशीम धागा निर्मिती केंद्र येथे वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.संजय सावकारे यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

 या प्रसंगी रेशीम विकास अधिकारी पी. एस. पाडवी, जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक सुनिल पाटील, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक बी.डी. माने, नायब तहसिलदार प्रकाश बुरूंगले, पोलीस पाटील सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

    रेशीम धागा निर्मिती केंद्र कवठेएकंद येथे 400 एन्ड चे 2 मशीन असून महिन्याला 20 हजार कि.ग्रॅ. कोषापासून रेशीम धागा निर्मिती केली जाते. या केंद्राच्या शेडचे 30 हजार चौ. फूट बांधकाम आहे. 18 हजार कि.ग्रॅ. कोषापासून 2800 कि.ग्रॅ. इतके सूत उत्पादन होवू शकते. म्हणजेच प्रतिवर्षी २१६ मे. टन. कोषांचे रिलींग करुन ३३.५० मे.टन कि.ग्रॅ. सूत उत्पादन होवू शकते, सुताची विक्री ही बंगळुरू येथील सिल्क एक्सचेंज, वाराणसी, तामिळनाडू, गुजरात इत्यादी राज्यामध्ये केली जात असून या सुतास प्रति किलो ५ हजार ४०० ते ५ हजार ५०० रूपये इतका दर मिळतो. महाराष्ट्र शासनाकडून सुत उत्पादनावर १५० रूपये प्रति किलो इतके अनुदान दिले जाते. या केंद्रावर दररोज ६० ते ७० इतके स्थानिक मजूर काम करीत असून त्यांना स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या केंद्रामुळे शेजारील सातारा, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम कोष बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

00000

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचन योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ

महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून योजना राबविण्याचा ग्राम विकास विभागाचा निर्णय

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे राखीव प्रवर्गाचे 389 अर्ज प्राप्त- मेघराज भाते

vishwatmaklokswamivarta

नवीन कायद्याचा वापर करुन देशामध्ये असलेला पहिला क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांपुढे आव्हान राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबध्द    – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बांगलादेशातील पुन्हा एकदा हिंदू व्यावसायिकावर गोळ्या झाडून हत्या

लोकसेवा हक्क अधिनियमाची संवेदनशीलतेने अंमलबजावणी करा – राज्य सेवा हक्क आयुक्त एन रामबाबू यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta