vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना जिल्ह्यात 25 ते 27 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी-  विजेच्या कडकडाटासह 25 ते 27 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता-नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे

जालना जिल्ह्यात 25 ते 27 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी-  विजेच्या कडकडाटासह 25 ते 27 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता-नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

 

            जालना प्रतिनिधी- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 25 ते 27 एप्रिल 2025 रोजी यलो अलर्ट जारी केला असुन या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची व ताशी 30 ते 40 कि.मी. प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधीत यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, खबरदारीची उपाययोजना म्हणून खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.

 हे करावे :- विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळया जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 हे करु नका :-आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली आंघोळ करु नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.धातूंच्या उंच मनो-याजवळ उभे राहू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) गणेश महाडिक यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन मिळावे, यासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलचे तसेच ‘आला रे आला… राज्य महोत्सव आला…’ या गीताचे लोकार्पण

शीख समाजातील लंगर सेवा : मानवतेचा समतेचा आणि सेवाभावाचा तेजस्वी आदर्श

जिल्ह्यातील 3 नगर परिषदांमध्ये 68 जागांसाठी 92 हजार 864 मतदार*

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण विभाग आढावा बैठकीत पिंक शाळा, शिष्यवृत्ती, शिक्षक समायोजन आदी विषयांवर सखोल चर्चा

काढणीपश्चात प्रक्रिया युनिट घटकाचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावेत

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार-2025’ प्रदान-महाराष्ट्रातील प्रतिभांचा विज्ञान भवनात सन्मान

vishwatmaklokswamivarta