vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दशकपूर्तीनिमित्त उद्या मुंबईत सोहळा

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दशकपूर्तीनिमित्त उद्या मुंबईत सोहळा

 

मुंबई प्रतिनिधी-सामान्य प्रशासन विभाग (प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता व सुशासन) व महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची ‘दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिना’ निमित्त राज्यस्तरीय सोहळा उद्या सोमवार २८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी १ वा. होणाऱ्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार व  मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे या अधिनियमाचे उद्दिष्ट आहे.

०००

संबंधित पोस्ट

पॅलेस्टाईन समर्थकांच्या मोर्चाला अनुमती नाकारली;हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश !दहशतवादाचे समर्थन करणारे असे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडा !- हिंदु राष्ट्र समन्वय समिती

ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

गावकर्‍यांचा संताप उसळला; भ्रष्टाचारग्रस्त मुख्याध्यापक चाऊस यांच्या बडतर्फीची मागणी; उपोषणाचा ईशारा-मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यपद्धतीचे गावकर्‍यांकडून कौतुक; शिक्षक संघटनांच्या दबाव तंत्राची सखोल चौकशी करण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta

चिल्ड्रन एड सोसायटीच्या कामकाजाचा मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा

अमृततर्फे मोफत ड्रोनपायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधीDGCA मान्यता प्राप्त प्रशिक्षणातून युवकांना नवे करिअर घडविण्याची संधी…

vishwatmaklokswamivarta

प्रशासकीय यंत्रणांद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची  प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक- मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन