vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

रेल्वे स्टेशन वरील चहा विक्रेत्यांवर वैधमापन शास्त्र विभागाची कारवाई

रेल्वे स्टेशन वरील चहा विक्रेत्यांवर वैधमापन शास्त्र विभागाची कारवाई

नवी मुंबई प्रतिनिधी: कोकण विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रेल्वे स्थानकावरील स्टॉलवर चहा, खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची विक्री होत असते. सहनियंत्रक, वैधमापन शास्त्र कोकण विभागचे शिवाजी काकडे, यांच्या सूचनेवरून नूकतिच कारवाई करण्यात आली.

तसेच ठाणे जिल्हयातील कल्याण व ठाणे, पालघर जिल्हयातील वसई, रायगड जिल्हयातील पनवेल व कर्जत, रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण व रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हयातील कुडाळ या रेल्वे स्टेशनवर संबंधित जिल्हा उपनियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली चहा, खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वैधमापन शास्त्र यंत्रणेतील निरीक्षकांनी अचानक भेटी देवून नूकतिच कारवाई करण्यात आली. वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ मधील तरतूदीन्वये तपासणी केली.

रेल्वे स्टेशनवरील चहा विक्री करणाऱ्या आस्थापनांना १५०/१८० मिली एवढी घोषित प्रमाण असताना तपासणीमध्ये ३० ते ८० मिली एव्हढा चहा कमी देत असल्याचे आढळून आले. अश्या एकूण ७ आस्थापनांवर वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ मधील तरतूदीन्वये प्रकरण दाखल करण्यात आले. वापरात असलेली तोलन उपकरणे विहित मुदतीत फेर पडताळणी व मुद्रांकन करून न घेतल्यामुळे ०४ प्रकरणे दाखल करण्यात आली. चिपळूण व रत्नागिरी स्टेशन वरील आस्थापनेवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आवेष्टित वस्तूवर नियमातील तरतूदीन्वये आवेष्टनावर घोषवाक्य नमूद न केल्यामूळे प्रकरण दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती पत्रकान्वय कोकण विभागाचे सह नियंत्रक,वैध मापन शास्त्राचे शिवाजी काकडे यांनी दिली.

0000000000000

संबंधित पोस्ट

सामूहिक तेलबिया पीक प्रात्यक्षिकांतर्गत शेतकरी प्रशिक्षण व शेती शाळा संपन्न नागापूर येथे सोयाबीन व्यवस्थापनावर मार्गदर्शन; प्रक्षेत्र भेटीतून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसन

1 जून  ते 31 जुलै कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी

vishwatmaklokswamivarta

जागतिक एड्स दिन विविध उपकमांनी साजरा

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईतील सर्वच विभागांत व्यापक लोकसहभातून वृक्षारोपण मोहीम – वृक्षसंवर्धनाचे आवाहन

विधानपरिषद प्रश्नोत्तर :ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये कोंम्बिग ऑपरेशनसह ऑल आऊट ऑपरेशन राबवणार– गृह राज्यमंत्री योगेश कदम

तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तरुण आणि पालकांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक –  पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले…