vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आंतरजातीय विवाह केलेल्या १४० जोडप्यांना अनुदान वितरीत

आंतरजातीय विवाह केलेल्या १४० जोडप्यांना अनुदान वितरीत

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्याची योजना समाजकल्याण विभागामार्फत चालविली जाते. जिल्ह्यात असे १४० लाभार्थी जोडपे होते. त्यांना प्रति जोडपे ५० हजार रुपये या प्रमाणे ७० लाख रुपयांचा लाभ वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी दिली आहे.

    समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेत जिल्ह्यात १४० लाभार्थी पात्र होते. त्यांना लाभ देण्यासाठी ७० लक्ष रुपयांची तरतूद प्राप्त झाली होती. ७२ लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली होती. मात्र ५६ लाभार्थ्यांचे ॲप्रुव्हल दि.३१ मार्च रोजी कालबाह्य झाले होते व १२ लाभार्थ्यांना बॅंकेकडून ॲप्रुव्हल मिळाले नसल्याने ६८ लाभार्थ्यांच्या लाभाची तरतूद शासनास परत गेली होती. तथापि, प्रादेशीक उपायुक्त दीपक खरात, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना याबाबत समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी माहिती दिली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आदेश निर्गमित करुन उर्वरीत ६८ लाभार्थ्यांचे अनुदान ३४ लाख रुपये तात्काळ पुन्हा अनुदान वितरीत करण्यात आले. आता या सर्व १४० लाभार्थ्यांना लाभाचे वितरण झाले आहे.

संबंधित पोस्ट

आदिवासी भागातील मत्स्यव्यवसायाला नवी चालना“धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान”योजनेचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

नंदा मुंदे यांना सेंद्रिय शेतीतील जैविक इंडियन हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतले महत्वपूर्ण निर्णय. –

vishwatmaklokswamivarta

गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जागर संविधानाचा’ भव्य कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जागतिक व्यासपीठावर नेण्याचा संकल्प – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचे उद्घाटन भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवणे ही सामूहिक जबाबदारी – समीर डोंगरे

20 वर्षाच्या संघर्ष; रमेशअप्पांच्या प्रयत्नांना यश! कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 23 एप्रिल रोजी होणार… 👏🏻🎉