vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उपमुख्यमंत्री पवार यांची पडेगाव येथील ‘संपूर्ण वन’ उपक्रमास भेट

उपमुख्यमंत्री पवार यांची पडेगाव येथील ‘संपूर्ण वन’ उपक्रमास भेट

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- पडेगाव येथे जनसहयोग या संस्थेने विकसित केलेल्या ‘संपूर्ण वन’ उपक्रमास आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. वृक्ष लागवड, संवर्धन करुन जनसहयोग संस्था करीत असलेल्या पर्यावरण संवर्धन कार्याचे श्री. पवार यांनी कौतुक केले.

 उपमुख्यमंत्री पवार हे आज शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पडेगाव येथील पुण्यश्लिक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र परिसरात जनसहयोग या संस्थेच्या उपक्रमातून ‘संपुर्ण वन’ही वनवाटीका विकसित करण्यात आली आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री पवार यांनी आज भेट दिली. विधान परिषदेचे आ.सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे त्याचे समवेत होते. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गिरे यांनी उपक्रमाची माहिती दिली. या प्रक्षेत्रावर २२ हजार वृक्ष लागवड करण्यात आली असून त्यात ४०० प्रजातीचे वृक्ष, वनस्पती इ. चा समावेश आहे. या उद्यानामुळे परिसरातील जैवविविधता विकासाला चालना मिळाली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. वृक्ष लागवड, वृक्ष देखभाल इ. कामे करणाऱ्या कामगारांशी श्री. पवार यांनी चर्चा केली. याठिकाणी साकारलेल्या भारत उद्यान, नक्षत्र उद्यान, बांबू उद्यान अशा विविध उद्यानांना भेट देऊन श्री. पवार यांनी पाहणी केली. लागवड झालेल्या वृक्ष प्रजातींची माहितीही त्यांनी करुन घेतली. विविध प्रजातीच्या वनस्पती, फुले, वेली आदी एकाच क्षेत्रात असल्याने याठिकाणी संशोधन केंद्र स्थापन करावे,अशी मागणी ही संस्थेच्या वतीने करण्यात आली. संस्थेचे संदीप जगधने, नंदन जाधव, मिलिंद गिरधारी आदी यावेळी उपस्थित होते.

०००००

संबंधित पोस्ट

ऊर्जा विभागातील भरती प्रक्रियेचा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर साकोरे यांच्याकडून आढावा

जगात शांततेसाठीचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतो – योगगुरू रामदेव बाबा

नव्या जीएसटी सुधारणांतून भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मेरा देश पहले- द अनटोल्ड स्टोरी ऑफ श्री. नरेंद्र मोदी’ कार्यक्रमात मोदीजींच्या जीवनाचे प्रेरणादायी पैलूंचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन२० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक…

vishwatmaklokswamivarta

आयआयएमसी’ची एमए आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; ई-समुपदेशनासाठी नोंदणीची अंतिम तारीख 7 जून 2026 तीन नवीन विशेष एमए अभ्यासक्रमांमुळे आयआयएमसीच्या सहा शैक्षणिक परिसरांमधील अभ्यासक्रमांमध्ये वाढ

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम समन्वय समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta