vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवजात शिशू गहाळ प्रकरणी अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल, चौकशी समिती स्थापन…

नवजात शिशू गहाळ प्रकरणी अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल, चौकशी समिती स्थापन…

सांगली, प्रतिनिधी- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथील प्रसूतिपश्चात (pnc) कक्ष क्रमांक 64 येथून दिनांक 3 मे 2025 रोजी दुपारी 12 च्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कोळे येथील कविता समाधान अलदार या महिलेचे 3 दिवसांचे पुरुष जातीचे बाळ अज्ञात महिलेने घेऊन गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात महिलेविरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस प्रशासनातर्फे सुरु असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज चे अधिष्ठाता यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

सौ. अलदार यांची सिझेरियन प्रसुति दि. 1 मे 2025 रोजी झाली होती. प्रसुतिनंतर त्यांना प्रसुतिपश्चात कक्ष येथे आंतररुग्ण स्वरुपात ठेवले होते. बाळ गहाळ झाल्याची बाब कर्तव्यावर उपस्थित परिचारिका यांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने महात्मा गांधी चौक, पोलिस स्टेशन, मिरज येथे तक्रार नोंदविण्यात आली. पोलिस प्रशासनाने घटनास्थळी तपासणी करुन संबंधितांचे जाब-जबाब घेऊन तसेच रुग्णालयातील सी.सी.टी.व्ही. फुटेज यांची तपासणी करुन संबंधित अज्ञात महिलेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे संस्थास्तरावर वरिष्ठ अध्यापकांची चौकशी समिती स्थापन केली असून त्यांना त्वरीत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

000

संबंधित पोस्ट

उद्योजकांना उद्योजकांकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध कर्ज योजना…

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू…

आजपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

vishwatmaklokswamivarta

अन्न व नागरी पुरवठा विभाग दिवाळीनिमित्त शंभर रुपयांत आनंदाचा शिधा,मैदा, पोह्याचा देखील समावेश.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी,गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव व पर्यावरण विषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मंजुरी..

११ मे रोजी समर्थ प्रतिष्ठानचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा*🟡 *_साधुसतांच्या उपस्थितीत होणार नयनरम्य सोहळा_*

vishwatmaklokswamivarta