vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्याने केलेली अतुलनीय कामगिरी अभिमानास्पद**देशाचे खंबीर नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन ~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

*ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्याने केलेली अतुलनीय कामगिरी अभिमानास्पद**देशाचे खंबीर नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन ~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

राज्य प्रतिनिधी ~ ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्याने दहशतवाद्यांची तळे नेमकी हेरून उध्वस्त केली.दहशतवाद नेस्तनाबूत करण्यासाठी सिन्दुर ऑपरेशन महत्वाचे ठरले आहे.या अतुलनीय कामगिरी बद्दल भारतीय सैन्याचा आम्हाला कायम अभिमान असून ऑपरेशन सिंदूर द्वारे सैन्याने केलेली अतुलनीय कामगिरी अभिमानास्पद आहे. दहशतवाद कायमचा गाडण्यासाठी ऑपरेशन सिन्दुर सारखी कारवाई पुन्हा पुन्हा करून पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घेतला पाहिजे.भारताचे खंबीर नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाकव्याप्त काश्मीर एकदिवस नक्की भारताचा ताब्यात घेतील याबद्दल आम्हाला विश्वास आहे.सिन्दुर सारखे ऑपरेशन घडवून पाकला धडा शिकविल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करीत आहोत.अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज दिली.

पहलगाम येथे पाकपुरस्कृत दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात निष्पाप निर्दोष 28 भारतीय पर्यटकांचे हत्याकांड घडविण्यात आले.त्याचा बदला आज भारताने सिन्दुर ऑपरेशन द्वारे घेतला आहे. मधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या भारतीय पर्यटकांना खरी श्रद्धांजली आज भारतीय सैन्याने आणि प्रधानमंत्री मोदींनी ऑपरेशन सिन्दुर द्वारे वाहिली आहे असे ना.रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले आज बुद्ध पौर्णिमा महोत्सव निमित्त व्हिएतनाम येथील हो ची मिन्ह या शहरात आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले असून व्हिएतनाम मधून ना.रामदास आठवले यांनी भारतीय सैन्याने केलेल्या सिन्दुर ऑपरेशन बद्दल भारतीय सैन्य दल आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा संदेश पाठवला आहे.

ऑपरेशन सिंदूर बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी , संरक्षणमंत्री राजनाथ सिंह , गृहमंत्री अमित शहा यांचे आणि भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन! आतंकवादाचा नायनाट करून प्रधानमंत्री मोदी पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेतील असा आम्हाला विश्वास आहे. आता पकड्याना चांगलाच धडा शिकवला असून पुन्हा भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची पाकची हिम्मत होणार नाही असे

केंद्रीय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी आपल्या संदेशात म्हंटले आहे.

 

संबंधित पोस्ट

लोकशाहीच्या या उत्सवात नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये मतदारराजानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि आमच्या कार्यक्षम, विकासाभिमुख उमेदवारांवर जो ठाम विश्वास दाखवला आहे, तो आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

vishwatmaklokswamivarta

बारामती विधानसभा पोटनिवडणुकरिता २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भय व सुलभरीत्या बजावता यावा, यासाठी मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर

सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती..– सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

प्राथमिक शिक्षण विभागाचे स्थलांतर वागळे इस्टेट येथील कार्यालयात; स्वच्छ भारत मिशन व कृषी विभाग बी. जे. हायस्कूल येथे स्थलांतर….

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त ‘जिजाऊ गाथा महोत्सव’;महोत्सवाचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी यांचे आवाहन

अचलपूर आणि परिसरातील १०५ गावांसाठीवाढीव पाणीपुरवठा योजनेस गती देण्यात येणार- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील