vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बॉलिवुडच्या रिॲलिटी शोच्या अभिनेत्रीला रेव्ह पार्टी भोवली,इगतपुरीत दोन बंगल्यांवर पोलिसांचा छापा.

बॉलिवुडच्या रिॲलिटी शोच्या अभिनेत्रीला रेव्ह पार्टी भोवली,इगतपुरीत दोन बंगल्यांवर पोलिसांचा छापा

प्रतिनिधी,

ड्रग्ज, कोकेन पावडर याचा नंगानाच करणाऱ्या रेव्ह पार्टीत तयारी करणाऱ्या माफिया आणि कलाकारांचा बॉलिवुडच्या कोरिओग्राफरसह रिॲलिटी शोच्या अभिनेत्रीला रेव्ह पार्टी भोवली; इगतपुरीत दोन बंगल्यांवर पोलिसांचा छापा ड्रग्ज, कोकेन पावडर, हुक्का जप्त.ग्रामीण पोलिसांचे पथक मुंबईला रवाना

नाशिक : बॉलिवुडमधील दोन कोरिओग्राफर, तामिळ आणि काही हिंदी चित्रपटांत अभिनय केलेल्या अभिनेत्रींसह एका रिॲलिटी-शोमधील अभिनेत्री यांना इगतपुरीमध्ये रेव्ह पार्टी करणे चांगलेच भोवले. पोलिसांच्या धाडीत येथील बंगल्यातून १० पुरुष आणि १२ महिला मिळून एकूण २२ व्यक्ती ड्रग्ज, कोकेन, गांजा सारख्या अमली पदार्थांचे सेवन करताना पोलिसांना सापडले. इगतपुरीचा परिसर नेहमीच पर्यटकांपासून बॉलिवुडच्या कलाकारांना भुरळ घालणारा ठरला आहे. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य अनेकांना खुणावते. याचाच गैरफायदा घेत अंमली पदार्थांची नशा करण्याकरिता मुंबई येथून हायप्रोफाईल सिनेतारकांचाही राबता या भागात असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा दिसून आले आहे. येथील दोन खासगी बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास ड्रग्ज, कोकेन, हुक्कासारख्या अंमली पदार्थांची नशा करत बॉलिवूडशी संबंधित चार महिलांसह एकूण २२ उच्चभ्रू व्यक्तींचा समुहाची पार्टी होत असल्याची गोपनीय माहिती नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकत या सर्वांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी अंमली पदार्थांची नशा करत ‘रेव्ह पार्टी’च्या नावाखाली धिंगाणा घालणाऱ्या सर्वांना ताब्यात घेत पोलीस वाहनातून त्यांना नेण्यात आले

संबंधित पोस्ट

राज्यात १६ ठिकाणी सिक्युरिटी मॉक ड्रिल

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मीरच्या पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत जाहीर…

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा १६७० कोटींचा व्याज परतावा वितरीत*१.७७ लाख तरुणांना स्वयंरोजगाराची संधी

कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील एव्हीजीसीएक्सआर क्षेत्रातील बदलता प्रवाह या परिसंवादातील सूर

आज रविवार, २० जुलै रोजी मुंबईतील मध्य व हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक…

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील नेहरू नगर कुर्ला पूर्व येथे,अडाणी हटाव कुर्ला बचाव च्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा मोर्चा

vishwatmaklokswamivarta