vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मेळघाटातील पाणीटंचाई निवारणासाठी जलसंधारणाची कामे*जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

मेळघाटातील पाणीटंचाई निवारणासाठी जलसंधारणाची कामे*जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

अमरावती, प्रतिनिधी- मेळघाटातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध गावांमध्ये पाणीटंचाई उपाययोजना, नरेगा आणि सिंचन विभागातर्फे जलसंधारणाची कामे आणि पाणी पुरवठ्याची कामे करण्यात येत आहे. या कामांची जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मंगळवार, दि. 13 मे रोजी पाहणी केली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, कार्यकारी अभियंता सुनिल जाधव, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, नायब तहसीलदार श्री. धावडे, सहायक गटविकास अधिकारी महेश वाढई, ग्रामिण पाणी पुरवठा उप अभियंता श्री. खाटकर, सिंचन उप अभियंता श्री. राठोड, उप अभियंता मोहिनी धांडे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी चिखलदरा तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेली पाणीटंचाईची कामे, रोजगार हमी योजना आणि सिंचन विभागाची जलसंधारणाची कामे, पाणी पुरवठ्याची कामे, तेंदूपत्ता संकलन आणि टेंब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट दिली बोराळा येथे नरेगा अंतर्गत जलशोषक चर आणि घरकुल, चांदपूर येथे नरेगाच्या सुरू असलेल्या कामास भेट आणि मजुरांसोबत चर्चा केली. बहादरपूर येथे सिंचन विभागाच्या साठवण बंधाऱ्याची पाहणी, तसेच टँकरची माहिती घेतली. धरमडोह येथील गावाने पाणीटंचाईवर पेसा आणि स्वनिधीच्या मदतीने मात करून नियमित लागणारे टँकर बंद केले आहे. त्याबाबत भेट देऊन सरपंच, सचिव आणि नागरिकांशी संवाद साधला.

टेंब्रूसोंडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन पाहणी. यावेळी प्रस्तावित ग्रामीण रूग्णालयाच्या जागेबाबत चर्चा व मार्गदर्शन केले. कुलंगणा खुर्द येथे पाणीटंचाई अंतर्गत केलेल्या उपाययोजनेच्या कामास भेट देऊन सरपंच, उपसरपंच आणि नागरिकांशी संवाद साधला. सोमवारखेडा आणि मलकापूर येथील कोल्हापुरी बंधारा कामाची पाहणी केली. त्यानंतर बागलिंगा आणि 14 गावे या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जल प्रक्रिया केंद्राच्या कामास भेट दिली. तसेच हिरदामल येथे ग्रुप ऑफ ग्रामसंघातर्फे सुरू असलेल्या तेंदूपत्ता संकलन फळीला भेट देऊन श्री. जामकर यांच्याशी चर्चा केली.

00000

संबंधित पोस्ट

नाशिक येथील गृहनिर्माण कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

शारीरिक, मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे जिल्हा परिषदेने योग दिनी साधला विश्वविक्रमी भक्तियोग

विकासाच्या प्रक्रियेत राज्य शासन-शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी – पालकमंत्री पंकजा मुंडे

बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राजधानीत महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी

बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान; विविध कार्यक्रमाचे आयोजन