vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेचे उद्घाटन

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेचे उद्घाटन

पुणे, प्रतिनिधी: जागतिक, राष्ट्रीय, जिल्हा तसेच आणि सहकारी संस्था असे बँकांचे जाळे निर्माण झाले असून बँकिंग क्षेत्रात स्पर्धेच्या युगातील आमुलाग्र बदल विचारात घेता सहकारी बँकांनी ग्राहकाभिमुख व लोकाभिमुख झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

बिबवेवाडी येथे रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, रामराज्य सहकारी बँकेचे संस्थापक ॲड. सुभाष मोहिते, विजय मोहिते, अध्यक्षा नंदा लोणकर, उपाध्यक्ष शिरीष मोहिते, संचालक मंडळ परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, राज्यात सहकारी चळवळ वाढविण्यामध्ये धनंजय गाडगीळ, विठ्ठलराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख, शरद पवार यांचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे. सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात काळानुरूप बदल करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ‘प्रकरणे’ दाखल करावी लागणार आहेत. सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर सकारात्मक विचार करुन निर्णय घेण्यात येईल. सहकारी बँकेने आपल्या व्यवहारात मानवी चेहरा देण्याचे काम केले आहे, सहकारी क्षेत्रातील बँकेने अपेक्षित उद्दिष्टांपेक्षा अधिक नफा मिळविण्यास प्रोत्साहन देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे.

रामराज्य सहकारी बँक मागील २५ वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांना पुढे आणून त्यांची पत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये संचालक मंडळ, सभासद कर्जदारांचे फार मोठे योगदान आहे. सभासदांचे हित जपणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. बँकेने ठेवी वाढविण्यासोबत खात्रीलायक कर्जदार मिळविण्याकरिता प्रयत्न करावे. नागरिकांना पारदर्शक पद्धतीने सुलभ सेवा देण्याचा प्रयत्न करावा. बँकिंग व्यवसायात विश्वासर्हता जपणे गरजेचे आहे. तरुणांना संधी देऊन त्यांना बँकीग क्षेत्राचे प्रशिक्षण देण्याचे काम करावे. थकीत कर्जाकडे बारकाईने लक्ष द्यावे. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्याच्या प्रमाणात वाढ होत असून सहकारी बँकांनी राज्य सहकारी बँकेसोबत संलग्न झाले पाहिजे, असेही श्री. पवार म्हणाले.

संबंधित पोस्ट

अन् अंबडच्या जिल्हा परिषद शाळेत १९७२ च्या आठवणींना उजाळाअंबड जि.प. प्रशालेच्या १९७२ चे गेटू-गेदर :१९७२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन..

vishwatmaklokswamivarta

पु. ल. देशपांडे म्हणजे राज्याचा हॅप्पीनेस इंडेक्स – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नूतनीकृत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नव्या संकुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

जिल्हा रुग्णालयात अवयवदान पंधरवड्याला सुरुवातØ अवयवदान जनजागृती रॅलीला उत्सफूर्त प्रतिसाद

पणन हंगाम 2024-25 योजनेंतर्गत धान खरेदी करण्यासाठी दि.31 मार्च 2025 रोजी पर्यंत मुदतवाढ..

vishwatmaklokswamivarta

सकल गोर बंजारा समाज हैद्राबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला तात्काळ अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गामध्ये सामावून घ्यावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु आहे..

vishwatmaklokswamivarta

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालखी महामार्गाची पाहणी