vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात पद भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात पद भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सांगली यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलां/मुलींचे वसतिगृह येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, माजी सैनिक पत्नी मधून अशासकीय पदे भरावयाची आहेत. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दिनांक 29 मे 2025 रोजी सकाळी 9.45 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

            निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरावयाची पदे पुढीलप्रमाणे. सहायक वसतीगृह अधिक्षक /अधिक्षिका – 02 पुरूष मुलांच्या वसतिगृहासाठी व 02 महिला मुलींच्या वसतीगृहासाठी, चौकीदार – 02 (मुलांच्या व मुलींच्या वसतीगृहासाठी प्रत्येकी एक), सफाई कामगार – 03 (मुलांचे वसतीगृह, मुलींचे वसतीगृह व विश्रामगृह यासाठी प्रत्येकी एक), स्वयंपाकी महिला – 08 (मुलांच्या व मुलींच्या वसतीगृहासाठी प्रत्येकी 4), माळी – 02 (मुलांच्या व मुलींच्या वसतीगृहासाठी प्रत्येकी एक).

अधिक माहितीसाठी 0233-2990712 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. माजी सैनिक / माजी सैनिक विधवांना प्राधान्य देण्यात येईल. सहायक वसतीगृह अधिक्षक सेवानिवृत्त एनसीओ /जेसीओ असावा. चौकीदार सेवानिवृत्त सैनिक असावा, टंकलेखन / संगणकाचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

00000

 

वसंतराव नाईक विमुक्त जा

संबंधित पोस्ट

मुंबईतील वांद्रे ते कुर्ला #पॉडटॅक्सी चा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाची उभारणी”बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा” तत्त्वावर

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध…

ऐरोली आदिवासी पाडा येथे उपयोगी साहित्याचे वितरण

vishwatmaklokswamivarta

महासाधना सप्ताह;सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ‘कर्मयोगी’प्रशिक्षण पूर्ण करावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

एसटी महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना मिळणार ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड;आधार संलग्न ‘सरल’ व ‘अपार’ क्रमांक अनिवार्य