vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ऐरोली आदिवासी पाडा येथे उपयोगी साहित्याचे वितरण

ऐरोली आदिवासी पाडा येथे उपयोगी साहित्याचे वितरण

              नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने, जीवनज्योती प्रतिष्ठान वाशी आणि नवी मुंबई रिटेल केमिस्ट असोसिएशन या संस्थांच्या माध्यमातून, आदिवासी पाडा यादवनगर ऐरोली येथे आदिवासी महिलांसाठी साडी व इतर उपयोगी साहित्याचे वाटप आणि वृद्ध, वयस्कर व्यक्तींसाठी वॉकर स्टिक/ काठी वाटप तसेच शालेय मुलांसाठी स्कूलबॅग, वॉटरबॅग, वह्या आणि कंपास इ. शालेय वस्तूंचे वाटप नमुंमपा समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पालांडे यांच्या हस्ते, ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. नैनेश बदले यांच्या सहकार्याने संपन्न झाले. याप्रसंगी जीवन ज्योती प्रतिष्ठान या संस्थेचे संचालक श्री. विजय ताम्हाणे आणि पदाधिकारी श्री. रवी ताजने, श्री. जालिंदर ताजने, श्री. वसंत ताजने, केमिस्ट असोसिएशनचे सचिव श्री. सुनील छाजेड, श्री. भरत दर्जी, श्री. शंकर जेजुरकर, श्री. बाबुराव माने, श्री. गोपाल पाटील उपस्थित होते

00000

संबंधित पोस्ट

अंगणवाडी गुणवत्ता विकास प्रक्षीक्षण संपन्न

धर्मवीर संभाजी हायस्कूल ठरले ‘माजी विद्यार्थी संघ’ स्थापन करणारे पहिले विद्यालय.विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात – २५ वर्ष जुन्या आठवणींनी शिक्षक -विद्यार्थ्याचे पाणावले डोळे

vishwatmaklokswamivarta

भटक्या श्वानांबाबत जाहीर आवाहन

vishwatmaklokswamivarta

पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात २० गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट कामांना मंजुरी१०५.३१ लाख रुपयांच्या १२७ उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता..

खोट्या तक्रारी करून ग्रामपंचायतीची बदनामी करणार्‍याविरूध्द कारवाई करा ग्रामस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन..

भारतीय कामगार सेना- महिको कंपनीमध्ये वेतन वाढीचा ११ वा ऐतिहासिक करार- कामगारांना सोयी-सवलतीसह ४ हजार ५०४ रुपये मासिक वेतन वाढ

vishwatmaklokswamivarta