vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसायस्थानिक बातम्या

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्यामहत्वाकांक्षी प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची आशियाई विकास बँक अधिकारी यांच्याशी चर्चा

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्यामहत्वाकांक्षी प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची आशियाई विकास बँक अधिकारी यांच्याशी चर्चा

मुंबई, प्रतिनिधी : मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदरे विभागामार्फत राज्यात अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. या प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी उपलब्ध होण्याबाबत मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांनी आशियाई बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

 यावेळी आशियाई बँकेचे राष्ट्रीय संचालक मिओ ओका, राष्ट्रीय उपसंचालक आरती मेहरा, नगर विकास तज्ञ संजय जोशी, प्रकल्प अधिकारी भावेश कुमार हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर ‘उदय’ चे सल्लागार प्रितेश बाफना उपस्थित होते.

  यावेळी मुंबईतील तारापोला मत्स्यालय, मुंबईतील वॉटर मेट्रो, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड चे नवीन बंदर उभारणी, विद्यमान बंदराची देखभाल दुरुस्ती, आणि देखरेखीसाठीच्या निधीविषयी चर्चा करण्यात आली. सकारात्मक झालेल्या या चर्चेमध्ये आशियाई विकास बँक अधिकारी यांनी लोकहिताच्या व विकासाच्या या प्रकल्पांमध्ये निधी देण्याविषयी सकारात्मकता दर्शवली. तसेच सॉव्हरींग आणि नॉन सॉव्हरींग निधी विषयीची सविस्तर माहिती दिली.

   प्राथमिक स्वरूपात झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पांचा व निधीचा अभ्यास करून तो पुन्हा आशियाई विकास बँकेस सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  या चर्चेमुळे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्या अनेक प्रकल्पांना निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांना आर्थिक बळ मिळणार आहे.

०००००

संबंधित पोस्ट

शिवजयंती दिनी ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेचे आयोजन-पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी पदयात्रेचे काटेकोर नियोजन करून यशस्वी करावी – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta

इयत्ता १० वी, १२ वी पुरवणी परीक्षा;५८१९ विद्यार्थ्यांसाठी २४ केंद्रांवर सज्जता

राष्ट्रीय बालिका दिवस विशेष अमरावती डाक विभागाची ‘सुकन्या समृध्दी खाते’ मोहिम “नन्ही मुस्कान, बडी उडान”

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावेजिल्ह्यातील मंडळांना ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे – पालकमंत्री जयकुमार गोरे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार