vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

9 जूनला डाक अदालतीचे आयोजन

9 जूनला डाक अदालतीचे आयोजन

 

बुलडाणा, प्रतिनिधी: पोस्ट विभागाच्या तक्रारी सोडविण्यासाठी बुलडाणा डाकघर विभागातर्फे सोमवार, दि. 9 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आले आहे. पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल सहा आठवड्यात तक्रारींचे निवारण झालेले नसल्यास अशा तक्रारींची दखल डाक अदालतीमध्ये घेतल्या जाणार आहे.   देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये पोस्टाच्या सेवेने वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देताना संभाषण, पत्रव्यवहार किंवा सेवेमध्यील काही त्रृटीमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रारी होतात. तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवडा करण्यासाठी पोस्ट खात्यातर्फे डाक अदालती घेण्यात येते. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डरबाबत तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. तक्रारीत तारीख आणि ज्या अधिकाऱ्यास मुळ तक्रार पाठविली त्याचे नाव आणि हुद्दा आदी संबधित माहिती डाक सेवेबाबत तक्रार डाकघर अधिक्षक गणेश आंभोरे, बुलडाणा विभाग, यांचे नावे दोन प्रतीत शुक्रवार, दि. 6 जून 2025 पर्यंत पोहचेल, अशा रीतीने पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

मधाचे गांव मांघर येथे मधपेट्या वाटप

vishwatmaklokswamivarta

१०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा

राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरतीची लेखी परीक्षा 17 मे रोजी…

आता लाडकी बहीण योजनेसाठी आधार प्रमाणीकरण…

vishwatmaklokswamivarta

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• आयुष्मान भारत कार्ड निर्माण व वितरण गतिमान करण्याच्या सूचना

भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची होणार तपासणी