vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या भरतीसाठी पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या भरतीसाठी पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

मुंबई, प्रतिनिधी: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी पात्र उमेदवारांना कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 16 जून 2025 ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. 65 आयोजित करण्यात येत आहे. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या भरती पूर्व प्रशिक्षणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे दि. 5 जून 2025 रोजी मुलाखतीस सकाळी 10.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे (डीएसडब्ल्यू) यांच्या संकेतस्थळावर सीडीएस-65 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट काढून व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. तसेच उमेदवार लोकसंघ आयोग (युपीएससी) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. या परीक्षेकरिता ऑनलाइन द्वारे अर्ज केलेला असावा. ही पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावेत.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी: training.pctenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हाट्सअप क्र. 9156073306 (प्रवेश मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

जालना शहर महानगरपालिका प्राथमिक शाळा नागेवाडी जालना या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सव..

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई कारवाईत अंदाजे 50 लाखांचा मुद्देमाल नष्ट

डाक विभागाची सांगलीत 25 मार्चला पेंशन अदालत

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय  कार्यालयात आयडीबीआय बँकेच्या सीएसआर निधीतून कल्याण तालुक्यातील काही शाळा व शासकीय रुग्णालयांना संगणक, प्रिंटर्स व टॅब्सचे वाटप

अमृत दुर्गोत्सव – पनवेलमध्ये दुर्ग बांधणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादविद्यार्थ्यांनी साकारल्या ऐतिहासिक दुर्गांच्या अप्रतिम प्रतिकृती..

vishwatmaklokswamivarta