vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• आयुष्मान भारत कार्ड निर्माण व वितरण गतिमान करण्याच्या सूचना

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• आयुष्मान भारत कार्ड निर्माण व वितरण गतिमान करण्याच्या सूचना

लातूर, प्रतिनिधी: नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विस्तारित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड निर्माण व वितरित करण्याची कार्यवाही अधिक गतिमान करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

विस्तारित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या जिल्हास्तरीय पालक जनआरोग्य संरक्षण कार्यकारिणीची बैठक पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीस सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अभिमन्यू पवार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावकर, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, महानगरपालिका आयुक्त मानसी मीना, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, आरएमओ डॉ. अशोक सारडा, जिल्हा समन्वयक डॉ. बालाजी गोरे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा कवच देण्यासाठी सरकार कटीबद्ध असून, या योजनांतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहेत. यामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपये, तर ज्येष्ठ नागरिकांना वैयक्तिक पाच लाख रुपयांपर्यंतचा अतिरिक्त लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आयुष्मान भारत कार्ड आणि वयवंदना कार्डांचे निर्माण व वितरण युद्धपातळीवर करावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

विस्तारित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लातूर जिल्ह्यातील अंमलबजावणीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ढेले यांनी माहिती दिली.

संबंधित पोस्ट

ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र वापरण्यास मनाई

नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणांना त्यांच्या हद्दीतील शासकीय जमिनी मिळणार…

राज्यस्तरीय पोलीस क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज साकेत मैदान, ठाणे येथे संपन्न

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यकØ राज्य निवडणूक आयोगाचे आदेश जारीØ जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती गठीत…

vishwatmaklokswamivarta

गेटवे ऑफ इंडिया येथे नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत ‘बिटींग रिट्रीट’

vishwatmaklokswamivarta

चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शताब्दी वर्षात समतामूलक भारताचा