vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आय आय टी मुंबईतल्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी या संस्थेतले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांची काल सुमारे १० तास चौकशी केली. 

आय आय टी मुंबईतल्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी या संस्थेतले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांची काल सुमारे १० तास चौकशी केली.

मुंबई प्रतिनिधी

आय आय टी मुंबईतल्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी या संस्थेतले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांची काल सुमारे १० तास चौकशी केली. साहिलच्या पालकांनी प्राध्यापक डुल्ला यांच्यावर साहिलला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याचा आणि त्याच्याशी जाती आधारित भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.

पवई येथील आयआयटी मुंबईतील (IIT Bombay) बीटेकचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या कथित आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांची चौकशी सुरू असतानाच, या प्रकरणात आयआयटी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. आयआयटी मुंबईने प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना डीन  पदावरून दूर केले आहे, तसेच साहिलच्या मृत्यूबाबत संस्थेने यापूर्वी केलेल्या वक्तव्यांबद्दल जाहीर माफीही मागितली आहे.

मिळालेली माहिती अशी की साहिल वाकोडे याच्या पालकांनी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. प्राध्यापकांनी साहिलला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आणि त्याच्याशी जातीवर आधारित भेदभाव केला, असा आरोप पालकांनी केला.या आरोपांनंतर मुंबई पोलिसांनी प्राध्यापक डुल्ला यांची सुमारे १० तास कसून चौकशी केली आहे.

 विद्यार्थ्यांमधील वाढता असंतोष आणि गंभीर आरोप लक्षात घेता,च्या वृत्तानुसार, आयआयटी प्रशासनाने प्राध्यापक डुल्ला यांना त्यांच्या डीन पदावरून तडकाफडकी हटवले आहे. यासोबतच, या संवेदनशील घटनेनंतर संस्थेने सुरुवातीला केलेल्या काही विधानांमुळे वाद निर्माण झाला होता, ज्याबद्दल प्रशासनाने आता अधिकृतपणे माफी मागितली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलिस करत असून, कॅम्पसमधील जातीय भेदभाव आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

संबंधित पोस्ट

नरनाळा महोत्सवात ‘इन्व्हेस्टर्स मीट’ : पर्यटन क्षेत्रातील संधींबाबत मंथनगुंतवणूकदारांना सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन.

नव्या मुंबईतील कोपरखैरणे येथील इमारतीचा स्लॅब कोसळला – समाजमंदिरात रहिवाशांची निवास व्यवस्था

पंतप्रधान कार्यालयानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडूनही प्रस्तावाला गती; नागभीड–मार्कंडादेव रेल्वेमार्गासाठी दुहेरी सकारात्मक हालचालPMO ने रेल्वे बोर्डाकडे पाठविला प्रस्ताव; जिल्हाधिकारी कार्यालयानेही विभागीय आयुक्तांकडे केला वर्ग — केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष छबिलदास सुरपाम यांच्या पाठपुराव्याला यश

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस▪️सीएसआर प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग (एपीटीएल) प्रणालींची स्थापना

vishwatmaklokswamivarta

महिलांचा कायदा व प्रशासनावर विश्वास वाढविणे महत्वाचे; अशा उपक्रमांमुळे महिलांना न्याय मिळण्यास मोठी मदत होईल – विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत नवी मुंबई येथे 28 प्रकरणांवर सुनावणी पूर्ण