vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिवछत्रपती क्रडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळप्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश सन 2026-27 “

” शिवछत्रपती क्रडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळप्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश सन 2026-27 “

नांदेड प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरीता राज्यात प्रतिभावंत खेळाडूची निवड करुन शास्त्रोक्त प्रशीक्षण शिक्षण, भोजन, निवास, अद्यावत क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधीनीच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्यातुन जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अदयावत क्रीडा सुविधा पूरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे बालेवाडी,पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत.सन 2026-27 साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत सदर 06 क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश (50%) व कौशल्य चाचणी (50%) प्रक्रियेअंतर्गत खालील निकषानुसार निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहेत. सदर प्रवेश प्रक्रीयासाठी खालील प्रमाणे नियम अटी व शर्ती राहणार आहेत.

क्रीडा प्रबोधिनी ठिकाणे – राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली अशा 9 ठिकाणी क्रीडा प्रबेाधिनीची स्थापना करण्यात आली होती. सदर ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी मध्ये क्रीडा प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.

क्रीडाप्रबोधिनी मधिल क्रीडा प्रकार –ज्युदो, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, ॲथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हॅन्डबॉल, टेबलटेनिस, वेटलिफटींग, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सींग अशा 16 क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते.

प्रवेश प्रक्रीया सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी –सरळ प्रवेश प्रक्रीया – क्रीडा प्रबोधिनीतील असलेलया सबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्षआतील आहे अशा खेळाडूंना सबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो. तथापी सरळ प्रवेश प्रक्रियेमध्ये जर इच्छुकांची संख्या 50% पेक्षा जास्त असल्यास प्रथम प्राधान्य सरळ प्रवेश अंतर्गत पात्र होणा-या निवासी व अनिवासी खेळाडूंना राहील. खेळनिहाय कौशल्य चाचणी – क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या सबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्षे आतील आहे अशा खेळाडूंना सबंधीत खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जाईल.

 खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र, पुणे- ॲथलेटिक्स, सायकलींग, शुटींग खेळात ज्यांचे वय 20 वर्षे आतील आहे अशा खेळाडूंना सबंधीत खेळाबाबतची कोशल्य चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो.· वैदयकीय चाचणी – उपरोक्त चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैदयकीय पथकाद्वारे चाचणी घेऊन क्रीडा प्रबोधिनीमध्ये शारीरिक दृष्टया सुदृढ खेळाडूंची निवड अंतिम करण्यात येत आहे.जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर चाचण्या आयोजित करताना करावयाची कार्यवाही-अ) जिल्हास्तर –1) आपल्या शाळेच्या/ संस्थेच्या/ संघटनेच्या वतीने जिल्हा, विभाग व राज्य क्रीडा प्रबोधिनी चाचण्यांबाबत माहिती सर्वांना अवगत करण्यात यावी.2) जिल्हास्तरावर क्रीडा प्रबोधिनी विभाग चाचणीसाठी सहभागी होणा-या खेळाडूंची नांवे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल,नांदेड येथे नोंदणी करण्यात यावी. खेळाडूंचे नांव, जिल्हा, खेळप्रकार, जन्मदिनांक, वय व क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र याबाबत माहिती संकलित करुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांचेकडे दि.22 एप्रिल,2026 पर्यंत सादर करावीत

ब) विभागस्तर –विभागस्तरावर कौशल्य व सरळ प्रवेश चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.सन 2026-27 विभागस्तरीय प्रवेश प्रक्रिया क्रीडा कौशल्य व सरळ प्रवेश चाचणी वयोमर्यादा व आयोजन दिनांक सरळ प्रवेश- खेळ- हॅन्डबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, बॅडमिंटन (अनिवासी ठाणे करिता)कौशल्य चाचणी- खेळ- हॅन्डबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो, जिम्नॅस्टिक्ससरळ प्रवेश व कौशल्य चाचणी छत्रपती संभाजीनगर करिता- ॲथलेटिक्स, हॉकी याची वयोमर्यादा दि.01/01/2007 नंतर जन्मलेला असावा तसेच विभागस्तरीय चाचचणी आयोजन दि.27 ते 30 एप्रिल , 2026 दरम्यान राहील.खेलो इंडिया निपुणता केंद्र, पुणे – खेळ- सायकलींग, शुटींग, ॲथलेटिक्स – खेळाडूची जन्तारीख दि.01/01/2006 नंतर जन्मलेले परंतु 20 वर्षे वयोमर्यादेपेक्षा जास्त असलेले खेळाडू पात्र नाही.

क) राज्यस्तर चाचणी सरळ प्रवेश प्रक्रिया कार्यक्रम. हॅण्डबॉल या खेळाकरीता चाचणी दि.04 ते 05 मे,2026 स्थळ- क्रीडा प्रबोधिनी नागपूर.हॅण्डबॉल, जलतरण, सायकलींग, फुटबॉल, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, बॅडमिंटन (अनिवासी ठाणे करीता), हॉकी- छत्रपती संभाजीनगर करिता चाचणी दि.04 ते 05 मे,2026 स्थळ- शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे- 45.ॲथलेटिक्स, शुटींग, सायकलिंग (थेट राज्यस्तर) – खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र- (ॲथलेटिक्स करीता- छत्रपती संभाजीनगर) स्थळ – शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे- 45 चाचणी दि.11 ते 12 मे,2026.फुटबॉल- सरळ प्रवेश – दि.15 ते 16 मे,2025 व फुटबॉल – कौशल्य चाचणी- दि.17 ते 18 मे,2026 स्थळ – शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणेशुटींग (थेट राज्यस्तर) – खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र- दि.18 ते 19 मे,2026 शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे

राज्यस्तर खेळ निहाय कौशल्य चाचणी वेळापत्रकहॅण्डबॉल- चाचणी दि.06 ते 07 मे,2026, स्थळ- क्रीडा प्रबोधिनी, नागपूर.हॅण्डबॉल, जलतरण, सायकलींग, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, बॅडमिंटन (अनिवासी ठाणे करीता), हॉकी- छत्रपती संभाजीनगर करिता चाचणी दि.06 ते 07 मे,2026, स्थळ- शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे ॲथलेटिक्स, शुटिंग, सायकलींग खेलो इंडिया निपुणता केंद्र, पुणे, ॲथलेटिक्स छत्रपती संभाजीनगर करिता- चाचणी करीता चाचणी दि. 11 व 12 मे,2026, स्थळ- शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे

क्रीडा प्रबोधिनी मध्ये खेळाडूंच्या रिक्त पद संख्या –राज्यातील क्रीडा प्रबोधिनी मध्ये खेळ निहाय रिक्त पदांची रिक्त संख्या तसेच खेळाडूंची क्षमता, कौशल्य विचाारात घेवून प्रवेश देण्यात येईल. निवडण्यात येणा-या खेळाडूंना राज्यातील कोणत्याही क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षण स्थळ हे क्रीडा संचालनालय स्तरावर निश्चित करण्यात येईल. त्यानुसार प्रवेश सबंधित क्रीडा प्रबोधिनी मध्ये घेणे आवश्यक राहील.

सर्वसाधारण सूचना -सदर चाचण्यांकरीता येणा-या खेळाडूंनी स्वत: निवास, प्रवास व भोजन व्यवस्था वैयक्तिक स्तरावर करावयाची आहे.सदर चाचण्यांकरीता येणा-या खेळाडूंनी सबंधित स्पर्धेचे प्राविण्य/ सहभाग प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, आधार कार्ड इत्‍यादी मूळ कागदपत्रे चाचणी स्थळी आणणे बंधनकारक आहे,गुगल लिंक बाबत :-गुगल लिंक मध्ये नोंदणी करण्याची शेवटची तारीख २३ एप्रिल २०२६ आहे. तद्नंतर नोंदणी केलेल्या खेळाडूंची यादी खेळ व चाचणी निहाय संबंधित विभागीय उपसंचालक यांना पाठविण्यात येणार आहे.

जे खेळाडू गुगल लिंकवर नाव नोंदणी करणार नाहीत अश्या खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नांदेड येथे नांव नोंदणी करावेत, जेणे करुन सदरचे खेळाडूं ऐनवेळी चाचणीच्या दिवशी उपस्थित राहिल्यास अश्या खेळाडूना चाचणी देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. क्रीडा प्रबोधिनी करिता घेण्यात येणाऱ्या चाचण्या विभाग व तद्नंतर राज्यस्तरावर आयोजित केल्या जाणार आहेत.https://forms.gle/aqnpWXJKP2wsMVpdA               या करीता या कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर प्रसिध्दी व अर्ज संकलन करणेकरीता जिल्हयातील खेळाडूंनी आपले विहित नमुन्यातील अर्ज, जन्म दिनांकाबाबत व क्रीडा कामगिरी बाबत आवश्यक कागदपत्रे ( क्रीडा प्रमाणपत्रे,/ आधारकार्ड/ जन्म दाखला इत्यादी) माहितीसह अर्ज दि. 22 एप्रिल,2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे सादर करावेत. व अधिक माहितीकरीता श्री. राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी) यांचेशी संपर्क साधावा असे महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड यांनी कळविले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यकØ राज्य निवडणूक आयोगाचे आदेश जारीØ जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती गठीत…

vishwatmaklokswamivarta

इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती शमाईल नदवी याच्या संविधान विरोधी वक्तव्याचा जाहीर निषेध🏴

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक *महसूलमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील मंदिर विश्वस्तांनी नोंदवला ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारुपाला’ तीव्र विरोध,सूचना आणि हरकती यांसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढीचे महसूलमंत्र्यांचे आश्वासन !

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला देशाची हरित ऊर्जा राजधानी बनविण्याचे उद्दिष्ट- अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

झोन स्तरीय निरंकारी बाल समागम

संरक्षित खतसाठा पुरवठा कालमर्यादेचे पालन करावे- जिल्हाधिकारी स्वामी