vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – 04 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025..

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – 04 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025..

ठाणे, प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे नियोजन दि.27 मे 2025 ते 30 मे 30 मे 2025 व 02 जून 2025 ते 05 जून 2025 या कालावधीत करण्यात आलेले आहे. तथापि, 1 हजार 107 उर्दू माध्यमाच्या विद्यार्थी उमेदवारांची डी.एल.एड. परीक्षा व TAIT परीक्षा एकाच दिवशी येत आहे. तेव्हा डी.एल.एड द्वितीय वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेस प्रविष्ठ होणारे जे विद्यार्थी TAIT-2025 या परीक्षेसाठी सुध्दा प्रविष्ट झाले असतील अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा दि.03 जून 2025 ऐवजी दि.30 मे 2025 रोजी नियोजित आहे.

तरी विद्यार्थी / उमेदवारांनी उपरोक्त बदलाची नोंद घेऊन परीक्षेस दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित व्हावे. त्यानुसार झालेल्या बदलाप्रमाणे स्वतःची माहिती तपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करुन घेऊन परीक्षेस उपस्थित व्हावे, याबाबत सर्वस्वी जबाबदारी उमेदवारावर राहील, याची नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -4 आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

0000000000

संबंधित पोस्ट

रक्ताच्या नात्याने केले ‘निराधार’ पण तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाने दिला आपुलकीचा आधार.!

vishwatmaklokswamivarta

ऐतिहासिक घटना: भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म

vishwatmaklokswamivarta

भारतीय हवामान खात्याच्या  जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २० ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता

उत्तम क्रीडापटू घडविण्यासाठी चांगल्या क्रीडा स्पर्धांची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट; आरोग्य व्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta

नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच