vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पोलीस हवालदार समद खान पठाण सेवानिवृत्त-समाजसेवक मुसा खान यांनी सेवानिवृत्त बद्दल पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला

 पोलीस हवालदार समद खान पठाण सेवानिवृत्त-समाजसेवक मुसा खान यांनी सेवानिवृत्त बद्दल पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला

औरंगाबाद- प्रतिनिधी -वेदांतनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार समद खान रशीद खान पठाण हे ३२ वर्षे सेवा केल्यानंतर ३१ मे रोजी निवृत्त झाले. पठाण यांनी त्यांच्या सेवेदरम्यान एमआयडीसी वाळूज, वाळूज, क्रांती चौक, गुन्हे शाखा आणि इतर ठिकाणी काम केले आहे. शनिवारी वेदांतनगर पोलिस ठाण्यामार्फत त्यांचा निरोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पीआय प्रवीणा यादव, सामाजिक कार्यकर्ते मुसा खान आणि इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन आदरपूर्वक निरोप दिला.

मुसा खान यांनी सांगितलं की, समद खान हे 1993 मध्ये पोलीस दलात भरती झाले होते त्यानंतर समद पठाण यांनी विविध पोलीस ठाण्यात आपले कर्तव्य पार पाडीत त्यांनी पोलीस दलात 32 वर्षीय सेवा पूर्ण केले असून समद पठाण यांना पुढील आयुष्य साठी मुसा खान यांनी शुभेच्छा दिलेले आहेत त्यांनी यापुढेही समाजामध्ये राहून चांगली समाजसेवा करावी अशी अपेक्षा ही व्यक्त केलेली आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट वापरास बंदी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी निवडणुकांची घोषणा. भारतीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १८ जूनला मतदान होणार असून, २२ जूनला मतमोजणी होईल. 

मतदार यादी विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रम;तपशील अद्ययावत न केल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता

सांगलीत आयर्विनचा समांतर पूल सार्वजनिक वापरासाठी खुला…

vishwatmaklokswamivarta

ज्वेल्स ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथील सार्वजनिक ई व्ही चार्जींग स्टेशन जनतेसाठी खुले…

जिल्ह्यामध्ये दि.12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन