vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मान्सून कालावधीत यंत्रणांनी सज्ज राहावे-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*कृती कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी

मान्सून कालावधीत यंत्रणांनी सज्ज राहावे-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*कृती कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी

     अमरावती, प्रतिनिधी: येत्या मान्सून कालावधीत एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये, यासाठी क्षेत्रिय स्तरावरील यंत्रणांनी सज्ज राहावे, तसेच राज्य शासनाच्या 100 दिवस कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात आज मान्सूनपूर्व आढावा आणि कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, उपविभागीय अधिकारी मिन्नू पी. एम., प्रियंवदा म्हाडदळकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, प्रसेनजित चव्हाण यांच्यासह क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

  जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, येत्या मान्सूनच्या कालावधीत सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. पूर परिस्थिती उद्भवू शकणाऱ्या गावांमध्ये बाधीत होणाऱ्या नागरिकांची राहण्याची व्यवस्था करावी. बाधीतांना आताच नोटीस देण्यात यावी. पूर परिस्थितीनंतर साथरोग उद्भवत असल्याने आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहून तातडीने कार्यवाही करावी. तसेच बचाव पथकांच्या बोटी सुस्थितीत आणि वापरात असल्याची खातरजमा करण्यात यावी. पथकांना पुरविण्यात आलेल्या साहित्याची तपासणी करावी. मान्सून कालावधीत जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष 24 तास सुरू राहील. यावर येणाऱ्या दूरध्वनीची नोंद ठेवण्यात यावी.

  शासनाच्या कृती कार्यक्रमात प्रामुख्याने नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी लक्ष द्यावे. प्रामुख्याने पोर्टलवर दाखल तक्रारीची तातडीने दखल घेण्यात यावी. या तक्रारीची गांभीर्याने निपटारा करावा. तसेच कार्यालयात भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या भेटी घ्याव्यात. कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करावा. यामुळे अचूक आणि आदर्श आदेश मिळण्यास मदत होणार आहे. शासनाने घरपोच सुविधा देण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे क्षेत्रिय स्तरावर फिरते सेतू केंद्र उभारण्याबाबत कार्यवाही करावी. यासोबतच जलसंधारण, वृक्षारोपण आणि सेवा हमी कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधा राबविण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.

 

000000

संबंधित पोस्ट

एसएसबी परीक्षेच्या मोफत प्रशिक्षणासाठी 17 सप्टेंबरला मुलाखती 

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन पक्षाचा 68 वा वर्धापन दिन सोहळा महाड येथे 3 नोव्हेंबर रोजी होणार.. 

vishwatmaklokswamivarta

जालना सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

आज शुक्रवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयएएस आकाश वर्मा, उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे यांचे मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हा-तावरजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज रहावे- नागरिक संरक्षण संचालनालयाचे आवाहन