vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

येत्या तीन महिन्यात प्राण्यांची गणना करणार-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

येत्या तीन महिन्यात प्राण्यांची गणना करणार-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 

     अमरावती, प्रतिनिधी : जिल्ह्यातील पशूधनाची अचूक माहिती व्हावी, यासाठी येत्या तीन महिन्यात प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. तसेच प्राण्यांचे टॅगींग करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राणीक्लेश समितीची सभा पार पडली. यावेळी जिल्हा अधिक्षक पोलिस अधिकारी विशाल आनंद, पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्यासह समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्ह्यातील पशू गणनेची माहिती घेतली. पशूधन वाढविण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्यात यावे. तसेच येत्या पावसाळ्याच्या कालावधीत जनावरांना आजाराची लागण होऊ नये, यासाठी लसीकरण तसेच खबरदारी घेण्यात यावी. येत्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची तस्करी होऊ नये, यासाठी जिल्ह्यात आठ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहे. गोवंशाची वाहतूक होऊ नये, यासाठी परिवहन विभागानेही दक्ष राहावे. तस गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पोलिस विभागातर्फे योग्य कार्यवाही करण्यात येईल.

बकरी ईदला गोवंशाचा बळी टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. बकरी ईदला प्राण्यांचा बळी देण्यात येतात. मात्र यावर्षी बकरी ईदला गोवंशाचा बळी देण्याचे टाळावे. गोवंशाचा बळी देणे कायद्याने गुन्हा असून असे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. गोवंशाचा बळी देऊ नये, यासाठी जनजागृती करावी, तसेच कायद्याची माहिती नागरिकांना द्यावी. येत्या काळात जनावरांची खरेदी विक्री होत असलेल्या ठिकाणी लक्ष ठेऊन ही विक्री नियमाप्रमाणेच होण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.

 

000000

संबंधित पोस्ट

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला सुरूवात

पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

मदरशांचे ५० लाखांचे अनुदान थांबवून त्यांचे सामान्य शाळांत रूपांतर करा!- हिंदु जनजागृती समितीची राज्यशासनाकडे मागणी,उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर मदरशांचे सर्वेक्षण करा; अन्यथा राज्यभर जनआंदोलन छेडण्याचा इशारा 

विनापरवाना ड्रोन उडवणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल – नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन 

तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार 2024 साठी अर्ज सुरू; अंतिम तारीख 15 जुलै 2025

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, शारीरिक क्षमता निर्माण करावी- राज्यपाल हरिभाऊ बागडे* ▪️शिरूर अनंतपाळ येथे प्रभाकर कुलकर्णी गुरुजी यांचा जीवनगौरव सोहळा  ▪️’असा एक प्रभाकर’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta