vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे डॉ. मुळे यांना भेटवस्तू, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित

लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे डॉ. मुळे यांना भेटवस्तू, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित

लातूर प्रतिनिधी: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लातूर विभागीय माहिती कार्यालयातील उपसंचालक (माहिती) डॉ. सुरेखा मुळे या 31 मे, 2025 रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या.

विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर, धाराशिव, नांदेड व हिंगोली जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत त्यांचा निरोप व सत्कार समारंभ पार पाडला. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरूद्ध अष्टपुत्रे, महासंचालनालयाचे सेवानिवृत्त संचालक गणेश रामदासी, सेवानिवृत्त संशोधन अधिकारी मयुरा देशपांडे-पाटोदकर, लातूरचे ज्येष्ठ पत्रकार अरूण समुद्रे, जयप्रकाश दगडे, लातूर ‍विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य नरसिंह घोणे, डॉ. मुळे यांच्या आई पुष्पा, मुळे परिवारातील सदस्य आदी उपस्थित होते.

कर्तव्य कालावधीत जुन्या, नवीन सहकाऱ्यांकडून बरेच शिकता आले. महासंचालनालयामध्ये काम करताना मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी, विभागीय संपर्क अधिकारी अशी पदे जबाबदारीने सांभाळली. महासंचालनालयातील माझ्या कर्तव्य कालावधीत सर्व चांगली माणसे मला मिळाली, हे माझे भाग्य असल्याचे डॉ. मुळे म्हणाल्या. डॉ. मुळे यांच्या सेवा कालावधीतील कार्याचा गौरव श्री. अष्टपुत्रे यांनी केला.

लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे डॉ. मुळे यांना भेटवस्तू, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

0000*

संबंधित पोस्ट

एन्व्हायरोटेक एशिया 2026′ परिषदेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे जल व्यवस्थापनावर प्रभावी सादरीकरण…

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिद्धीकरिता -घरो घरी तिरंगा मोहीमेंतर्गत नवी मुंबईतील सर्व शाळांमध्ये विविध उपक्रमांचे उत्साही आयोजन,तिरंग्यासोबत सेल्फी घेऊन www.harghartiranga.com वेबसाईटवर अपलोड करण्याचे आवाहन

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

दिल्लीत गणरायाचे भक्तिमय स्वागत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा; महाराष्ट्र सदनासह मंडळांमध्ये उत्साहाचा जयघोष

महाराजस्व अभियानात सर्व विभागाने पुढाकार घ्यावा- संजय केनेकर.

नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यक; जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन – रणजितसिंह राजपूत

vishwatmaklokswamivarta