vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मिरा भाईंदर अपर तहसिलदार कार्यालयांतर्गत“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” संपन्न

मिरा भाईंदर अपर तहसिलदार कार्यालयांतर्गत“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” संपन्न

ठाणे,द प्रतिनिधी):- “गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण” या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यास मिळणाऱ्या नियतव्ययाच्या प्रमाणात कोणताही बदल न करता महसूली क्षेत्रिय कार्यालयाकडून जनतेस सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” मंडळ स्तरावर आयोजित करण्याकरिता महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- 2025/प्र.क्र.34/3-8 दिनांक 25 मार्च 2025 अन्वये महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत.

त्यानुषंगाने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या विद्यमाने मिरा भाईंदर अपर तहसिलदार कार्यालयांतर्गत दि.05 जून 2025 रोजी सेंट जोसेफ मराठी शाळा, उत्तन, भाईंदर (प.) येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रेशनकार्ड, नविन आधारकार्ड व दुरुस्ती इ. सेवांबाबत नागरिक/अर्जदार/विद्यार्थी यांच्याकडून प्राप्त अर्जांनुसार शिबिरामधेच वरील प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

या शिबिरासाठी ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, मिरा भाईंदर अपर तहसिलदार निलेश गोंड, नायब तहसिलदार स्मिता गुरव, भाईंदर मंडळ अधिकारी धनराज चव्हाण यांच्यासह सर्व तलाठी, महसूल कर्मचारी, शिधापत्रिका विभागातील कर्मचारी, सेतू चालक, आपले सरकार सेवा केंद्र चालक उपस्थित होते. या शिबिरांतर्गत अर्जदार/विद्यार्थी यांना वरील सेवा तात्काळ मिळाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले.

000000

संबंधित पोस्ट

पुणे जिल्ह्यातील मावळ  तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू. ३२ जण जखमी, बचावकार्य सुरु, दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख.

पनवेल येथे उद्योग सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

हिंदूंच्या श्रद्धेचा अवमान : नवी मुंबईत हजारो श्रीगणेशमूर्तींचे अजूनही विसर्जन बाकी ,दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून तातडीने शास्त्रोक्तविसर्जन करावे ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी  

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक *ऐन गणेशोत्सवात श्रीगणेशाचा जाहिरातीसाठी विडंबनात्मक वापर* !*बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा; हवेल्स व न्यूट्रिका कंपन्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नोटीस*

vishwatmaklokswamivarta

मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची अलिबाग तालुक्यातील मतदान,मतमोजणी केंद्र तसेच स्ट्राँग रूमला दिली भेट*

vishwatmaklokswamivarta

गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता