vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासकीय वसतीगृहासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

शासकीय वसतीगृहासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

जालना, प्रतिनिधी:- समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जालना जिल्ह्यातील मुला-मुलींना शासकीय वसतीगृहात शैक्षणिक वर्ष 2024-25 पासुन ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर व्यावसायिक अभ्यासक्रमाची ऑनलाईनपध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. इतर अभ्यासक्रमांचे गुणवत्तेनुसार ऑफलाईन प्रवेश करून सदरील अर्ज ऑनलाईन भरण्याबाबत सुचना दिलेल्या आहे. यामध्ये काही विद्याथ्यांचे अर्ज त्रुटीची पुर्तता करण्याकरिता रिव्हर्ट बॅक केले असुन सदरील अर्ज अद्याप पुन्हा सादर करण्यात आले नाही. अशा विद्यार्थ्याना दि. 10 जून 2025 सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी दि. 10 जून 2025 पर्यंत त्याच्या अर्जातील त्रुटीची पुर्तता न केल्यास त्यांचे अर्ज बाद ठरविण्यात येईल. समाजकल्याण कार्यालयातंर्गत मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह जालना, अंबड, घनसावंगी, बदनापुर, भोकरदन आणि मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह जालना, मंठा, अंबड, भोकरदन, या शासकीय वसतीगृहामध्ये सन 2025-26 या शैक्ष्‍ाणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देण्यात येणार आहेत.याकरिता गरजु व पात्र विद्यार्थ्यांकडून दि. 11 जून 2025 पासुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. याकरिता अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,विमुक्त जाती व भटक्या जमाती,,इतर मागासवर्गीय, विशेष मागासप्रवर्गासह इतर प्रवर्गाच्या इयत्ता आठवी, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रथम वर्षात प्रवेश ऑनलाईन पध्दतीने गुणवत्तेनुसार देण्यात येईल. शासकीय वसतीगृहात निवास,भोजन,शैक्षणिक साहित्य,निर्वाह भत्ता,ग्रंथालय,इंटरनेट वाय-फाय आदि सुविधा विनामुल्य उपलब्ध आहेत.तरी गरजू विद्यार्थ्यानीं प्रवेशाबाबतचे अर्ज करण्याकरिता https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे

संबंधित पोस्ट

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामांची यादी तात्काळ तयार करा- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊ- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी

जिल्हाधिकारी यांच्या 300 कोटी रुपये अतिरिक्त मागणीला मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद· राज्य नियोजन समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

दोन महिला चालवतात फरलव्ह पेट रिसॉर्ट व डॉग ट्रेनिंग सेंटर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती येथे ‘सुजान सर्जिकल आणि कॅन्सर हॉस्पिटलचे’ उद्घाटन करण्यात आले. 

vishwatmaklokswamivarta