vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान; विविध कार्यक्रमाचे आयोजन

बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान; विविध कार्यक्रमाचे आयोजन

बुलडाणा, प्रतिनिधी: जागतिक बालकामगार विरोधी दिन दि. 12 जुन रोजी संपूर्ण जगात पाळला जातो. हा दिवस 2002 पासून पाळण्यात येत असून या दिनाचे औचित्य साधून सरकारी कामगार अधिकारी म.तु. जाधव यांच्याद्वारे बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान व सप्ताह जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.

या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करुन त्यामध्ये जिल्ह्यातील दुकाने, हॉटेल, व्यापारी संस्था व इतर सर्व आस्थापनांच्या व्यापारी बंधुना बालकामगार या अनिष्ट प्रथेविरुध्द माहिती देवून तसेच त्यांना बाल मजुरी निर्मुलनाचे महत्व समजावुन सांगण्यात येवुन जनजागृती करण्यात येणार आहे.

आमच्याकडे बालकामगार काम करीत नाहीत व यापुढेही बालकामगार ठेवणार नाही, असे हमीपत्र व्यापारी वर्गाकडून भरुन घेण्यात येईल. कोणत्याही आस्थापनेने 18 वर्षाखालील बालक किंवा किशोरवयीन बालकास आपल्या आस्थापनेवर कामास ठेवू नये, ठेवल्यास सदर आस्थापनेवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल.

लहान वयात काम केल्यामुळे बालकांच्या त्वचा, श्वसनमार्ग संस्था, मेंदु, जठर संस्था यावर विपरीत परीणाम होतो. त्यांची मानसिक, शारीरीक व बौध्दीक वाढ खुंटते. चांगले जीवन जगण्याचा त्यांना अधिकार आहे, तो आपण सर्वांच्या प्रयत्नाने व मदतीने त्यांना मिळाला पाहीजे. या निमित्ताने बालमजुरी मुक्त महाराष्ट्र या मोहिमेमध्ये सुध्दा जागरुक नागरीक म्हणुन सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी म.तु. जाधव यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे प्रत्येक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे घेतले पाहिजेत-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आयटीआय मध्ये नव्या सहा अभ्यासक्रमाचीही केली घोषणा

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी २६ एप्रिल २०२६ रोजी मतदान-सातारा जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

आज 14 ऑक्टोबर पोलीस पाटील पदभरती-2025 लेखी परिक्षेचा  निकाल..लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांच्या 15 ऑक्टोबर होणार मुलाखती

vishwatmaklokswamivarta

ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिवांनी घेतला आवास योजनाचा आढावा,आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या – एकनाथ डवले

बनावट कागदपत्रांद्वारे जालन्यातील सर्व्हे ५५४ मधील 5 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न उघडकीस,न्यायालयाच्या आदेशावरून तत्कालीन भूमी अभिलेख अधीक्षक व दुय्यम निबंधकासह ५ जणांवर गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta