शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६ ठाणे जिल्ह्यात जल्लोषात साजरा होणार मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली नियोजन पूर्ण..
ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे)- शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये दि. १६ जून, २०२५ रोजी शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे नव्याने प्रवेश घेणाऱ्या बालकांचे आनंददायी आणि उत्साहवर्धक वातावरणात स्वागत करण्यात येणार आहे.ठाणे जिल्ह्यातील एकूण १ हजार ३२८ जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे ७१ हजार ३२४ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना ३ हजार २७९ शिक्षक मार्गदर्शन करत आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे
शाळा प्रवेशोत्सवाची वैशिष्ट्ये व नियोजन:प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे.”पहिले पाऊल” उपक्रम – इ. १लीच्या विद्यार्थ्यांचा पायाचा ठसा घेऊन पालकांना देण्यात येणार आहे.सर्व नवख्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट व मोजे यांचे वितरण.मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ देऊन पहिला दिवस गोड करण्याचे नियोजन.प्रभातफेरी, ढोल, बॅनर व फलकांद्वारे गावात जनजागृती.कोविड-१९ अनुषंगाने आरोग्यविषयक प्रबोधन व मार्गदर्शन.अधिकारी व लोकप्रतिनिधींचा सहभाग:दि. १६ जून रोजी मा. मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी, जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी/कर्मचारी शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करतील.या संदर्भात उद्या, दि. १२ जून, २०२५ रोजी तालुकास्तरावर संपर्क अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.शाळा पूर्वतयारी व स्वच्छता:दि. १४ व १५ जून रोजी सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वच्छता व सजावट करण्याचे निर्देश.शाळा परिसरात स्वच्छ, आकर्षक व विद्यार्थ्यीं स्नेही तयार करणे.१००% उपस्थिती आणि प्रवेशासाठी विशेष उपक्रम:पहिल्या दिवशी १००% विद्यार्थी उपस्थित राहतील यासाठी विशेष नियोजन. दंवडी, प्रभातफेरी, व पत्रक वाटपाद्वारे जनजागृती अभियान.तालुक्यातील सर्व प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना १००% शाळेत प्रवेश देणे हे ध्येय.शाळाबाह्य व स्थलांतरित बालकांना शोधून प्रवेश देण्यासाठी विशेष सर्वेक्षण व अहवाल.
यंत्रणा व समन्वय:पर्यवेक्षीय यंत्रणा, मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समित्यांची संयुक्त बैठक आयोजित.जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अधिनस्त सर्व घटकांना याआधीच सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.गटशिक्षणाधिकारीमार्फत स्वतंत्र शाळाभेट नियोजन करण्याचे निर्देश.शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांशी संवाद व प्रोत्साहनाचे कार्यक्रम राबवले जाणार.या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाने होत असून, जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभागाकडून हे आयोजन यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वयाने कार्य केले जात आहे.शाळा प्रवेशोत्सवाचा उद्देश शिक्षणाची गोड सुरुवात घडवून आणणे, बालकांमध्ये शाळेप्रती आकर्षण निर्माण करणे व पालकांमध्ये जागरूकता वाढवणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये दि. १६ जून २०२५ रोजी हा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली आहे