vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती व न्यायमूर्ती मंडळ यांनी व्यक्त केल्या अहमदाबाद विमान दुर्घटनाप्रकरणी संवेदना…

मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती व न्यायमूर्ती मंडळ यांनी व्यक्त केल्या अहमदाबाद विमान दुर्घटनाप्रकरणी संवेदना…

 

राज्य प्रतिनिधी मुंबई, : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच न्यायमूर्ती मंडळ आणि नोंदणी विभागातील अधिकारी यांनी अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात प्राण गमावलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती आपल्या तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.

या दु:खद प्रसंगी पीडित कुटुंबियांच्या सोबत खंबीरपणे उभे असून, त्यांच्या दु:खात सामील असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पीडित कुटुंबियांना या दुःखाच्या प्रसंगी बळ आणि मानसिक आधार मिळावा, यासाठी सदिच्छा व प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.

त्याचप्रमाणे, बी. जे. मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल, अहमदाबाद येथील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गासाठीही आपल्या सदिच्छा व प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.

 

००००

संबंधित पोस्ट

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विचार सामाजिक समता आणि न्यायाची प्रेरणा देणारे : मंत्री छगन भुजबळ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा समाज परिवर्तनासाठी प्रेरणादायी : मंत्री गिरीश महाजन

दि.5ऑगस्ट रोजी पनवेल येथे जनता दरबाराचे आयोजन ….       

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा जागर; डि.जे.पी. कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धा उत्साहात.

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी कुंभच्या यशस्वी आयोजनासाठी निधी कमी पडू देणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· साधू, महंत यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे भव्य-दिव्य आयोजन· आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा

उदंड प्रतिसादाने ‘महालक्ष्मी सरस -२०२६’ प्रदर्शनाची सांगता; २२ कोटींहून अधिक रुपयांची रेकॉर्डब्रेक उलाढाल ग्रामीण महिलांच्या कष्टाचे नवी मुंबईत झाले सोने ; ‘स्मार्ट’ सुविधांनी जिंकली मुंबईकरांची मने

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत