vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वामी विवेकानंद विद्यालयाचे वर्ग मूळ मान्य ठिकाणीच स्थलांतरित- शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

स्वामी विवेकानंद विद्यालयाचे वर्ग मूळ मान्य ठिकाणीच स्थलांतरित- शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई, प्रतिनिधी : चेंबूर येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या स्वामी विवेकानंद विद्यालय या शाळेचे वर्ग मूळ मान्य ठिकाणीच स्थलांतरित करण्यात आले असून त्यास बहुसंख्य पालकांचा प्रतिसाद प्राप्त झाला असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे स्वामी विवेकानंद विद्यालय, सिंधी सोसायटी, चेंबूर या शाळेच्या विद्यार्थ्यांचे पूर्वकल्पना न देता अन्य शाळेत स्थलांतर झाल्याच्या आशयाच्या बातम्या काही माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या अनुषंगाने शिक्षण उपनिरीक्षक, उत्तर विभाग, चेंबूर मुंबई यांनी चौकशी करुन, या शाळेचे वर्ग मूळ मान्य ठिकाणीच स्थलांतरित करण्यात आले असून त्यास बहुसंख्य पालकांचा प्रतिसाद प्राप्त झालेला आहे. सदर स्थलांतर हे नियोजनपूर्वक बहुतांश पालकांशी सुसंवाद साधून करण्यात आले असल्याबाबत कळविले आहे, अशी माहिती मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली आहे.

0000

संबंधित पोस्ट

भूमि अभिलेखकडील अर्धन्यायिक प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लोक अदालतीचे 26 सप्टेंबरला आयोजन

vishwatmaklokswamivarta

१३५ वर्षांची शिक्षण परंपरा: अक्षीकर पुरस्कारांनी आदर्श शिक्षकांचा सन्मान”छबिलदास शाळा, दादर येथे जनरल एज्युकेशन सोसायटीचा १३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा !

खारघर येथील हिंद दी चादर कार्यक्रमास देश-विदेशातून संत- महंत आणि भाविकांची उपस्थिती

रोटी क्लब मुंबई डिस्टिक 31 41 आयोजित आनंदोत्सवामुळे ज्येष्ठांकडून जाहीर आभार

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करा**कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल**विविध यंत्रणांकडून तयारीचा आढावा*

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर यांच्या मार्फत सन २०२६-२७ साठी ‘५० टक्के अनुदान योजना’ (७ लाभार्थी) आणि ‘बीज भांडवल योजना’ (१० लाभार्थी’) याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले