vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

तेलअवीव शहरात पहाटेच्या सुमारास क्षेपणास्त्रांचा मारा; इराण कडून पुन्हा एकदा मिसाइल हल्ला – इस्रायलचा दावा सायरननंतर लगेचच आकाशात धुराचे लोळ आणि प्रकाशरेषा दिसून आल्या.

तेलअवीव शहरात पहाटेच्या सुमारास क्षेपणास्त्रांचा मारा; इराण कडून पुन्हा एकदा मिसाइल हल्ला – इस्रायलचा दावा…

विदेश प्रतिनिधी-सायरननंतर लगेचच आकाशात धुराचे लोळ आणि प्रकाशरेषा दिसून आल्या.इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्डने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, त्यांनी इस्रायलमधील “लष्करी केंद्र आणि हवाई तळांसह डझनभर ठिकाणांवर” हल्ला केला आहे.

या निवेदनानुसार, इराणने या ऑपरेशनला “ट्रू प्रॉमिस 3” असं नाव दिलं आहे. या ऑपरेशनची अधिक माहिती नंतर दिली जाईल, असंही निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान, इस्रायली राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवेनं म्हटलं आहे की, तेल अवीव महानगर क्षेत्रात किमान पाच लोक जखमी झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात येत आहे.याआधी, शुक्रवारी (13 जून) इस्रायलनं इराणवर हल्ला केला होता.आधी इस्रायलचा प्रतिबंधात्मक हल्लाशुक्रवारी (13 जून) इस्रायलने इराणवर प्रतिबंधात्मक (pre-emptive) हल्ला केला. तसेच इस्रायलमध्ये आपात्कालीन परिस्थितीची घोषणा करण्यात आली, अशी माहिती इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी दिली.त्यांनी या हल्ल्यासंबंधीचं निवेदन प्रसिद्ध केलं.

त्यांनी या निवेदनात म्हटलं की, इराणवर केलेल्या प्रतिबंधात्मक हल्ल्यानंतर इस्रायली नागरिकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याची शक्यता तात्काळ निर्माण झाली.नागरी संरक्षण कायद्यान्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी एक विशेष आदेशावर स्वाक्षरी केली आहे, ज्याअंतर्गत संपूर्ण इस्रायलमध्ये गृहरक्षक दलाच्या कार्यक्षेत्रात विशेष आणीबाणीची स्थिती लागू केली जाईल.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही या हल्ल्यासंबंधी एक निवेदन प्रसिद्ध केले.

त्यांनी म्हटलं, “इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ सुरू केले आहे. इराणकडून इस्रायलच्या अस्तित्त्वाला निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य धोक्याला थोपवणे हा या कारवाईचा भाग आहे. हा धोका पूर्णपणे दूर करण्यासाठी आवश्यक तेवढे दिवस ही मोहीम सुरू राहील.”

“गेल्या काही महिन्यांत इराणने समृद्ध युरेनियमचे शस्त्रीकरण करण्याच्या दिशेने पावलं उचलली आहेत. हे रोखलं गेलं नाही, तर इराण लवकरच अण्वस्त्र निर्माण करू शकतो. कदाचित एका वर्षात, कदाचित काही महिन्यांत. हा इस्रायलच्या अस्तित्वावर एक स्पष्ट आणि तात्काळ निर्माण झालेला धोका आहे,” असं इस्रायलच्या पंतप्रधानांनी म्हटलं.

इराणची राजधानी तेहरानच्या ईशान्य भागात स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती इराणची सरकारी न्यूज एजन्सी नूर न्यूजचा हवाला देत रॉयटर्सने दिली.

स्फोटांचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचंही या वृत्तात म्हटलं.

संबंधित पोस्ट

अमेरिकेच्या राज्य विभागाने बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि तिच्या सशस्त्र शाखा ‘मजीद ब्रिगेड’ला परकीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित ..

राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे नेते बालेंद्र शाह यांनी आज नेपाळच्या पंतप्रधानपदी शपथ घेतली

आर्मेनियातील भारतीय दूतावास, टोवमास्यान फाउंडेशन आणि लुईसयोगा स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने #InternationalDayOfYoga2026 निमित्त १०८ सूर्यनमस्कारांच्या प्रेरणादायी सत्राचे आयोजन

रशिया चीनला तैवानवर आक्रमण करण्यासाठी गुप्तपणे युद्धकौशल्य, तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण…

vishwatmaklokswamivarta

इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च सन्मान ! 🇮🇳🇮🇱 

नेपाळमध्ये हिसक आंदोलन- नेपाळच्या प्रधानमंत्री के पी शर्मा ओली चा राजीनामा, हिंसक आंदोलनानंतर पायउतार; देश सोडला..

vishwatmaklokswamivarta