vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेप्रदेशस्थानिक बातम्या

अमली पदार्थ तस्करांवर कायद्याचा धाक यापुढेही कायम ठेवा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- 

अमली पदार्थ तस्करांवर कायद्याचा धाक यापुढेही कायम ठेवा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील-

सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यात अमली पदार्थ सेवन व विक्री संदर्भात कारवाई करून तस्करांवर चांगला धाक निर्माण करण्यात पोलीस विभाग आतापर्यंत यशस्वी झाला आहे. कायद्याचा हा धाक यापुढेही असाच कायम ठेवावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले. प्रतिनिधी प्रतिनिध

अमली पदार्थ टास्क फोर्सच्या नवव्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.कायद्याचा धाक, प्रबोधन व पुनर्वसन ही त्रिसूत्री यापुढेही प्रभावीपणे राबवावी, असे सूचित करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, चालू शैक्षणिक सत्रात प्रार्थनेवेळी अमली पदार्थविरोधी प्रतिज्ञा व अमली पदार्थ विरोधी परिपाठ यांची प्रभावी अंमलबजावणी करावी. यामुळे बालवयापासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर अमली पदार्थांच्या दुष्परिणाम रूजवले जातील. महापालिकेने निश्चित केलेल्या डार्क स्पॉटस्‌च्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे सूचित करून त्यांनी यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चिकित्सा केंद्राची उभारणी, महापालिका क्षेत्रात टॉवर पोलीस चौक्या याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अमली पदार्थ विक्रीबाबतची साखळी शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे सांगितले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, जिल्ह्यात एकूण 92 ब्लॅक स्पॉट असून यामध्ये सांगली महानगरपालिका क्षेत्रात 52 ब्लॅक स्पॉट असल्याचे सांगून सविस्तर आढावा सादर केला. महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी महानगरपालिका क्षेत्रातील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी दिवाबत्ती व सीसीटीव्ही लावण्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहर व ग्रामीण भागातील गुन्हेगारी घटनांचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबत सादरीकरण करताना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांची माहिती देऊन सर्व महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले असल्याचे सांगितले.00000

संबंधित पोस्ट

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत श्री काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा संपन्न..

मुंबईचे महापौर रितू तावडे यांना बॉम्बने उडवण्याची धमकीचा इमेल- पालिका मुख्यालयात सुरक्षेत मोठी वाढ …

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

श्वेता सिंघल यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला

vishwatmaklokswamivarta

नसरापूर बलात्कार व खून खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती!

करवीर हायकर्स’ च्या सातजणांची तिरंगा फडकवून,संविधान उद्देशिका प्रदर्शनाने एवरेस्ट बेस कँप’ यशस्वी… 

vishwatmaklokswamivarta