vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशव्यवसाय

वाळवा तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी जागेचा सर्वे करावा-उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले निर्देश

वाळवा तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी जागेचा सर्वे करावा-उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले निर्देश

मुंबई, प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथे प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राच्या स्थापनेसाठी या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) स्थापन करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना जागेचा सर्वे करण्याचे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.

सांगली जिल्ह्यातील वाळवा- आष्टा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्राबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सुहास बाबर, गौरव नायकवडी आदी लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एमआयडीसी करिता जागा अंतिम झाल्यानंतर त्या जागेचा कालमर्यादेत विकास करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. एमआयडीसीच्या स्थापनेमुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, वाळवा तालुक्यातील औद्योगिक विकासाला नवे आयाम मिळणार असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

०००

संबंधित पोस्ट

शंभर फुटी तिरंगा, प्रा. शरद पाटील स्मृती उद्यानाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

अखिल भारतीय धर्मसंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ संपन्न !प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात समस्त संत-महंतांची ,भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची एकमुखी मागणी !

vishwatmaklokswamivarta

बालगृहातील मुलांना शिक्षणासह सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

उद्योग संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024’ साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ

ज्ञानज्योती सावित्रीबाईफुले आधार व पंडित दिन दयाल उपाध्याय स्वयंम योजनेकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत