vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024’ साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024’ साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ

ठाणे प्रतिनिधी- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी दि.1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दि.31 जानेवारी 2025 असा होता. आता या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याकरिता दि.19 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळ मजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने http://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

0000

संबंधित पोस्ट

बालआनंद उत्सव-२०२५ सादरीकरणातून शिकाल जीवन जगण्याची कला- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी-दि.26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

राज्यातल्या २३ नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान.

vishwatmaklokswamivarta

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १ जून सायंकाळपर्यंत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी अंतिम यादीपूर्वी प्रक्रियेतील प्रत्येक तक्रार दूर करणार -शालेय शिक्षण विभाग

चिखली तहसील कार्यालयामार्फत ‘समाधान शिबिराचे’ आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

नद्यांमधील गाळ काढल्याने पूरपातळी नियंत्रित राहण्यास झाली मदत**वर्षानुवर्षे भेडसावणारी पूराची दहशत आली संपुष्टात*