vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महिलांकरिता बेलापूर व ऐरोली मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महिलांकरिता बेलापूर व ऐरोली मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र

        नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत बेलापूर भवन, से.11, सी.बी.डी. बेलापूर तसेच ऐरोली विभाग कार्यालय, से.3, ऐरोली, नवी मुंबई या ठिकाणी मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या सल्ला केंद्रामध्ये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आर्थिकदृष्टया दुर्बल तसेच गरजू महिलांवर होत असलेले अत्याचार, त्यांच्या कौटुंबिक व आर्थिक बिकट परिस्थितीबाबत मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 तरी, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आर्थिकदृष्टया दुर्बल तसेच गरजू महिलांनी समाज विकास विभाग कार्यालय, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन इमारत, 1ला मजला, से.11, सी.बी.डी., बेलापूर येथे अथवा ऐरोली विभाग कार्यालय, तळमजला, से.3, ऐरोली येथे मोफत कायदेविषयक सल्ला केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे नमुंमपा परिवहन उपक्रमाची आयटीएमएस प्रणाली तात्पुरती बंद-बस ट्रॅकर ॲपवर परिणाम

vishwatmaklokswamivarta

भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारापार्श्वभूमीवर आज (दि. २ जुलै) जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभाग-धोकादायक इमारतींविषयी जाहीर आवाहन

माहिती अधिकारीपदी संजीवनी जाधव-पाटील रुजू

आमदार विक्रम काळे यांना ‘मराठवाडा आयकॉन’ पुरस्कार

जिद्द आणि कष्टाच्या जोरावर रात्रीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी नव्या भारताचे आधारस्तंभ – प्राचार्य डॉ. धनंजय पष्टे