vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

औषधी व सुगंधी वनस्पतीच्या लागवड अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

औषधी व सुगंधी वनस्पतीच्या लागवड अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड / वृक्ष लागवड व फुलपीक लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आहे. शासना निर्णयानुसार अर्जुन, असान, अशोका, बेहडा, हिरडा, बेल, टेटू, डिकेमाली, रक्तचंदन, रिठा, लोध्रा, आइन, शिवन, गुग्गुळ, बिब्बा व करंज या १६ वृक्ष वर्गीय औषधी वनस्पतींना अनुदान अनुज्ञेय आहे. तरी, सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, औषधी व सुगंधी वनस्पती लागवड करू इच्छिणाऱ्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in यावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यामध्ये दि.१४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन.

संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’ या विषयावर परिसंवाद; कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग-संगीताच्या माध्यमातून साधना करण्यासाठी मार्गदर्शन करणारे गोव्यातील प्रस्तावित विश्वविद्यालय लवकर व्हावे ! – पू. पं. केशव गिंडे*

फणसावरील संशोधनासाठी कृषी विद्यापीठांतर्गत केंद्र स्थापन करण्यात येईल- कृषिमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत सदस्यांच्या भावना विचारात घेऊनबैठक घेण्याचे सभापतींचे निर्देश..

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा-१ चा प्रारंभनागरिकांनी सेवांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध-मंत्री अतुल सावे

उच्च व तंत्र शिक्षणात एकल पाल्य योजना’ राबवण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील