vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिंपोरा येथील पुलाची उभारणी तातडीने करावी सभापती प्रा.राम शिंदे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देशकामाबाबत तातडीने चौकशी करुन कारवाईचे निर्देश..

शिंपोरा येथील पुलाची उभारणी तातडीने करावी सभापती प्रा.राम शिंदे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देशकामाबाबत तातडीने चौकशी करुन कारवाईचे निर्देश..

मुंबई, प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील (जि. अहिल्यानगर) खेड-मानेवाडी ते शिंपोरा रस्त्यावरील पूल या भागातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी यांना रहदारीसाठी महत्वाचा आहे. हा पूल अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने या भागातील नागरिकांना रहदारीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. या परिसरातील नागरिकांना या मार्गावरून सुरळीत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी हा पूल नव्याने बांधण्याचा प्रस्ताव आठ दिवसात तत्काळ सादर करावा, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन, मुंबई येथील बैठकीत दिले.

सभापती प्रा. राम शिंदे आणि ग्रामविकास मंत्री श्री.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत विधान भवनातील दालनात पूल उभारण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव श्री.एकनाथ डवले, एम.एम.जी.एस.वाय. चे सचिव सतिश चिखलीकर, सहसचिव के.जी.वळवी, उप सचिव प्रशांत पाटील तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर आनंद भंडारी, सोलापूर पुनर्वसन विभाग उजनी अधीक्षक अभियंता श्री. साले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे श्री.भदाणे उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, पूल वाहून गेल्याच्या प्रकरणाची आठ दिवसात चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि आठ दिवसात नवीन, तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट पुल बांधणीबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात यावा, नव्या पुलास लोकभावनेस अनुसरुन ग्रामविकास विभागामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मौजे खेड-मानेवाडी ते शिंपोरा ता.कर्जत, जि.अहिल्यानगर या रस्त्यावरील नांदणी नदीवरील पूल अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने २५ मे, २०२५ रोजी वाहून गेला. त्यानंतर ९ जून, २०२५ रोजी सभापती प्रा. शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेबद्दल सभापती प्रा. शिंदे आणि ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

या पुलाच्या बांधकामाची चौकशी करावी, यासाठी नेमलेल्या समितीने आठ दिवसांत आपला अहवाल सादर करून दोषींवर कारवाई करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. लोकभावनेची दखल घेऊन पुलाची उभारणी आता तातडीने होणार असल्याने परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे, असेही सभापती प्रा.शिंदे म्हणाले.

*****

संबंधित पोस्ट

रायगड जि.प, पं.समिती सदस्यासाठी अलिबाग येथे कार्यशाळेचे आयोजन

कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा पहिल्या क्रमांकावर आल्याचं सांगत आता मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा बुधवार दि.१८ रोजी

भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

वज्रेश्वरी महोत्सव – विभागीय, जिल्हास्तरीय व मिनी सरस विक्री प्रदर्शन”चे उद्घाटन कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते आज संपन्न.

तामिळनाडूत मोठी उलथापालथ, थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाची पदार्पणातच दणदणीत कामगिरी