vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली.

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली.

 

राज्य प्रतिनिधी -आज बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली. उपस्थितांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी बाबा महेंद्रनाथ आणि बाबा हंसनाथ यांना आदराने वंदन केले आणि सोहगरा धामच्या पवित्र उपस्थितीचा उल्लेख केला. त्यांनी माँ थावे भवानी आणि माँ अंबिका भवानी यांनाही वंदन केले. पंतप्रधानांनी देशाचे पहिले राष्ट्रपती, देशरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना अभिवादन केले.

.केंद्र आणि राज्य सरकारांकडून अतिशय दृढ संकल्पाने पुढे नेले जात असल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. आजचा कार्यक्रम हा याच सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी याच व्यासपीठावरून करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आणि या विकास उपक्रमांमुळे बिहार उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करेल आणि समृद्ध राज्य निर्माण करण्यात योगदान देईल यावर भर दिला. सिवान, सासाराम, बक्सर, मोतिहारी, बेतिया आणि आरा यांसारख्या प्रदेशांच्या विकासात या प्रकल्पांची मोठी भूमिका असेल असे मोदी यांनी नमूद केले. या उपक्रमांमुळे गरीब, वंचित, दलित, महादलित, मागास आणि अत्यंत मागासलेल्या समुदायांचे जीवन सुकर होईल यावर त्यांनी भर दिला आणि या प्रकल्पांसाठी बिहारच्या जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

आपण नुकतेच परदेश दौऱ्यावरून परतल्याचे सांगताना मोदी यांनी सांगितले की, या दौऱ्यात त्यांनी जगातील काही सर्वाधिक विकसित राष्ट्रांच्या नेत्यांशी चर्चा केली. भारताच्या वेगाने होणाऱ्या वाढीने जागतिक नेते खूप प्रभावित झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हे नेते भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत असल्याचे पाहतात असे पंतप्रधानांनी नमूद केले आणि या परिवर्तनात बिहारची मोठी भूमिका असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. “समृद्ध बिहार देशाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल,” असे मोदी म्हणाले. याचे श्रेय त्यांनी बिहारच्या लोकांची शक्ती आणि क्षमतेमुळे निर्माण झालेल्या आत्मविश्वासाला दिले. राज्यातील अराजकाचे युग संपुष्टात आणल्याबद्दल पंतप्रधानांनी जनतेचे कौतुक केले.बिहारमधील आजच्या युवकांना दोन दशकांपूर्वीची या राज्याची स्थिती केवळ कथा आणि किस्से यांच्या माध्यमातून समजते असे त्यांनी नमूद केले. अराजकतेच्या त्या काळात झालेल्या अधोगतीची व्याप्ती त्यांना पूर्णपणे समजू शकत नाही याकडे लक्ष वेधत मोदी यांनी अधोरेखित केले की अनेक शतके भारताच्या प्रगतीचे नेतृत्व करणारे बिहार एकेकाळी मागील शासन व्यवस्थांच्या विळख्यामुळे सक्तीच्या स्थलांतराचे प्रतीक बनले होते.बिहारमधील प्रत्येक रहिवाशासाठी स्वाभिमान सर्वोपरि आहे यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की, माझे बिहारी बंधू आणि भगिनी अत्यंत कठीण परिस्थितीतही यशस्वी होऊन उल्लेखनीय लवचिकता दाखवतात. ते कधीही त्यांच्या स्वाभिमानाशी तडजोड करत नाहीत. मागील राजवटींनी बिहारच्या अभिमानाला मोठी हानी पोहचवली आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चाललेल्या त्या राजवटींवर त्यांनी टीका केली, ज्यामुळे गरिबी बिहारचे दुर्दैव बनले. मात्र असंख्य आव्हानांना न जुमानता, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या सरकारने बिहारला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणले आहे असे ते म्हणाले. गेल्या 10–11 वर्षांमध्ये बिहारमध्ये सुमारे 55,000 किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते बांधण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, 1.5 कोटींहून अधिक घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे तर 1.5 कोटी घरांना पाण्याची जोडणी मिळाली आहे. मोदी यांनी नमूद केले की, राज्यभरात 45,000 हून अधिक सामान्य सामान्य सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, बिहारमधील लहान शहरांमध्ये आता नवीन स्टार्ट-अप्स उदयास येत आहेत यावर त्यांनीभर दिला.

बिहारच्या विकासाची गती वाढत असल्याचे नमूद करत मोदी यांनी सावध केले की, पूर्वीच्या अराजकतेसाठी जबाबदार असलेले घटक आता सरकार आणि बिहारच्या आर्थिक संसाधनांवर पुन्हा नियंत्रण मिळविण्याची संधी शोधत आहेत. हे गट त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरत आहेत असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी बिहारच्या लोकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आणि समृद्ध बिहारच्या प्रवासाला खीळ बसवणाऱ्यांना दूर ठेवण्याची गरज अधोरेखित केली.

देशाने गरिबी निर्मूलनाच्या घोषणा बऱ्याच काळापासून ऐकल्या आहेत, परंतु त्यांच्या सरकारने हे दाखवून दिले आहे की गरिबी खरोखरच कमी करता येते असे पंतप्रधान म्हणाले. “गेल्या दशकात, 25 कोटी इतक्या विक्रमी संख्येने भारतीयांनी गरिबीवर मात केली आहे”, असे सांगून मोदी यांनी जागतिक बँकेसारख्या जागतिक स्तरावरच्या प्रसिद्ध संस्थांनी भारताच्या कामगिरीचे कौतुक केल्याचे अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की बिहार आणि विशेषतः नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या राष्ट्रीय यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पंतप्रधान म्हणाले की, यापूर्वी बिहारची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या अत्यंत हलाखीच्या स्थितीत होती. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये बिहारमधील सुमारे चार कोटी लोकांनी गरिबीवर मात केली आहे.

स्वातंत्र्यानंतर इतकी दशके उलटूनही लाखो लोक प्रयत्नांच्या अभावामुळे नव्हे तर त्यांच्याकडे पुढे जाण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे गरीब राहिले याकडे लक्ष वेधत मोदी यांनी यासाठी मागील राजवटीत दीर्घकाळ चाललेल्या परवाना राजला जबाबदार धरले, ज्यामुळे देश गरीब राहिला. त्या काळात प्रत्येक सेवा आणि संधीसाठी कठोर कोटा-परमिट प्रणाली होत्या, त्यामुळे अगदी छोट्याछोट्या कामांनाही परवाना आवश्यक होता . पंतप्रधानांनी सांगितले की, मागील सरकारांच्या राजवटीत गरिबांना घरे नाकारली जात होती, तर दलाल रेशनचे अन्नधान्य लुबाडून घेत होते. आरोग्यसेवा गरिबांच्या आवाक्याबाहेर होती आणि शिक्षण आणि रोजगार यासाठी सतत संघर्ष करावा लागत होता यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी नमूद केले की नागरिकांना वीज किंवा पाण्याची जोडणी मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये असंख्य हेलपाटे घालावे लागत होते. ते पुढे म्हणाले की गॅस जोडणी मिळवण्यासाठी खासदाराची शिफारस आवश्यक असायची आणि लाच दिल्याशिवाय किंवा शिफारशीशिवाय नोकऱ्या मिळत नव्हत्या.ते म्हणाले की या व्यवस्थेचा सर्वाधिक फटका प्रामुख्याने दलित, महादलित, मागास आणि अतिमागास समाजातील लोकांना बसला असून, या वर्गांना गरिबी निर्मूलनाची स्वप्ने दाखवली जात असताना, काही मूठभर कुटुंबे या प्रक्रियेत कोट्याधीश आणि अब्जाधीश झाली.

“गेली 11 वर्षे , आमचे सरकार गरिबांच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करण्यासाठी वचनबद्ध राहिले आहे. परिणामी, आता दृश्यमान आणि परिणामकारक परिणाम दिसू लागले आहेत.” पंतप्रधान मोदी म्हणाले. गेल्या दशकभरात, देशातील 4 कोटींहून अधिक गरीब कुटुंबांना सरकारी उपक्रमांतर्गत पक्की घरे मिळाली असून, आगामी काळात आणखी 3 कोटी घरे बांधली जाणार आहेत, असे त्यांनी नमूद केले. या विकासामुळे बिहारमधील गरीब, दलित, महादलित, मागासवर्गीय आणि अत्यंत मागास कुटुंबांना मोठा लाभ मिळाला आहे, यावर मोदी यांनी भर दिला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, केवळ या एका राज्यात 57 लाखांहून अधिक पक्की घरे बांधण्यात आली. सिवान जिल्ह्यात गरिबांसाठी 1.10 लाखांहून अधिक घरे बांधण्यात आली, असे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले आणि हे काम सुरळीतपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की आज बिहारमधील 50,000 हून अधिक कुटुंबांना घरांचे हप्ते वितरित करण्यात आले. यापैकी बहुतेक घरे माता आणि भगिनींच्या नावावर नोंदणीकृत आहेत याबद्दल मोदी यांनी विशेष समाधान व्यक्त केले. त्यांनी अभिमानाने नमूद केले की परंपरेने कधीही आपल्या नावावर मालमत्ता नसलेल्या महिलांना आता आपण घरमालक असल्याचा अभिमान आहे.सरकार गरिबांना केवळ घरेच नव्हे तर मोफत रेशन, वीज आणि पाण्याची सुविधाही देत आहे, याकडे लक्ष वेधत पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही वर्षांत देशभरात 12 कोटींहून अधिक नवीन कुटुंबांना नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळत आहे. केवळ सिवान जिल्ह्यात साडेचार लाखांहून अधिक कुटुंबांना प्रथमच नळाचे पाणी मिळाल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळ जोडणी आणि शहरी भागात पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने सरकार काम करत असल्याचे मोदी म्हणाले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की अलिकडच्या काळात बिहारच्या विविध शहरांमध्ये अनेक पाइपलाइन आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात आले आहेत. ते पुढे म्हणाले की, आता आणखी डझनभर शहरांसाठी नवीन पाइपलाइन आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. हे सर्व प्रकल्प गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जीवनाच्या दर्जात लक्षणीय सुधारणा घडवतील, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले

संबंधित पोस्ट

आज 14 ऑक्टोबर पोलीस पाटील पदभरती-2025 लेखी परिक्षेचा  निकाल..लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांच्या 15 ऑक्टोबर होणार मुलाखती

vishwatmaklokswamivarta

गुंतवणूक परिषदेत 1150 कोटींचे सामंजस्य करार उद्योगासाठी जिल्ह्यात तात्काळ सिंगल विंडो सुरू करणार जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण निश्चित उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदेतालुकानिहाय ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडत 15 जुलैला

गायरान धारकांना सातबारा देण्याच्या मागणीसाठी दलितआघाडीचे जिल्हा प्रमुख अ‍ॅड.भास्कर मगरे यांचे जिल्हाधिकारीकार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण :कास्तकर्‍यांचे अतिक्रमण कायदेशीर असून त्यांना सातबारा द्या – अ‍ॅड. भास्कर मगरे

शिवाजी पार्क वर दसरा मेळावा? शिवसेनेच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

vishwatmaklokswamivarta

कृपया प्रसिद्धीसाठी ! लेख : दीपावलीचे अध्यात्मशास्त्र- सनातन संस्था–दीपावलीचे अध्यात्मशास्त्र 

vishwatmaklokswamivarta