vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;अर्जासाठी 30 जूनपर्यंत पुन्हा संधी, नवीन वेळापत्रक जाहीर– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;अर्जासाठी 30 जूनपर्यंत पुन्हा संधी, नवीन वेळापत्रक जाहीर– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबई, प्रतिनिधी : शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दि. 20 मे 2025 पासून सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची 26 जूनपर्यंत मुदत होती. प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता, अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीची मुदतवाढ दि. 30 जुन 2025 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुढील संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्र शिक्षण संचालनालयाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. दि. 26 जून 2025 रोजी संध्याकाळपर्यंत तब्बल 1लाख 50हजार 684 विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज नोंदणी केलेली आहे, तर त्यापैकी 1 लाख 30 हजार 885 विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा केले आहे.

या वर्षी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) प्रवेशाच्या चार फेऱ्या घेण्यात येणार आहेत. पहिल्या फेरीसाठी पहिला विकल्प, दुसऱ्या फेरीसाठी पहिले तीन विकल्प, तिसऱ्या फेरीसाठी पहिले सहा विकल्प तर चौथ्या फेरीसाठी सर्व विकल्प अनिवार्य असणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॅप फेरीसाठी विकल्प अर्ज भरुन केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घ्यावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.

दहावीचा निकाल जाहीर होताच तंत्रशिक्षण संचालनालयाने पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले. दहावीनंतर कमी कालावधीत तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा एक उत्तम पर्याय आहे. हा पदविका अभ्यासक्रम 10 वी नंतर तीन वर्षांचा असतो व हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतात. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना पात्रतेच्या निकषानुसार विविध शिष्यवृत्ती शासनातर्फे देण्यात येते. पदविका शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात पात्रतेनुसार प्रवेश घेण्याची संधीही उपलब्ध असते.

मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) माध्यमातून अध्यापनाचा पर्याय निवडक पॉलिटेक्निकमध्ये उपलब्ध आहे. सभोवतालच्या औद्योगिक क्षेत्रांमधील आवश्यक गरजा ओळखून पॉलिटेक्निकमध्ये न्यू इमर्जिंग टेक्नॉलॉजी संबंधी सध्या मागणी असलेले नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम जसे की आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, रोबोटिक्स इ. असे अभ्यासक्रम सुरु केले गेले आहेत. विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी विविध कंपन्यांसोबत संचालनालयाने सामंजस्य करार केले आहेत. राज्यातील तंत्रनिकेतनांचे मॉनिटरिंग, अभ्यासक्रम, परीक्षा यावर महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत देखरेख केली जाते. मंडळामार्फत नवीन K-Scheme राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना 12 आठवड्यांचे अनिवार्य प्रशिक्षण देखील देण्यात येते. तसेच मंडळामार्फत राज्यात सर्वत्र पदविका अभ्यासक्रमाचा दर्जा उत्तम व एकसमान राखला जातो.शिक्षणामध्ये घडवून आणलेल्या सकारात्मक बदलामुळे पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना उत्तम पॅकेजच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रामध्ये विद्यावेतनासह प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होत आहेत.

पदविका प्रवेशासाठी सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा संपूर्ण तपशील, प्रवेशासंबंधीची माहिती घेण्यासाठी तसेच नाव नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी dte.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

0000

 

संबंधित पोस्ट

रक्षाबंधनानिमित्त रेल्वे डाक सेवा काउंटरवर रात्री उशिरापर्यंत बुकिंग सुविधा

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर· उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय· मंत्री व अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द· अत्यावश्यक सोडून विशेष विमान, हेलिकॉप्टर दौरे नको· बहुतेक बैठका व्हीसीद्वारे करण्याचे निर्देश· मंत्री व अधिकाऱ्यांनी किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे निर्देश..

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यांतर्गत कार्यवाही..

vishwatmaklokswamivarta

ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ आयोजित कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

हर घर तिरंगा–हर घर स्वच्छता’ मोहीमांतून नवी मुंबईत स्वच्छतेसह आरोग्यावर भर

पुण्यातील नॅन्सी होम प्रकल्पास विभागीय आयुक्तांनी भेट देऊन तातडीने अहवाल सादर करावा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

vishwatmaklokswamivarta