vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शीख बांधवाना विवाह नोंदणी करण्याचे आवाहन

शीख बांधवाना विवाह नोंदणी करण्याचे आवाहन

 जालना प्रतिनिधी :आनंद विवाह नोंदणी अधिनियम संपुर्ण जिल्हयामध्ये राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 व महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी 1999 नुसार राज्यात झालेल्या विवाहांची नोंदणी करुन पक्षकारांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. विवाह नोंदणी सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या दि.23 एप्रिल 2020 च्या अधिसुचनेनुसार महाराष्ट्र शासन आनंद विवाह नोंदणी निंबधक म्हणुन महानगरपालिका – संबंधीत प्रभाग अधिकारी,नगरपालिका/नगर परिषद/नगर पंचायत/कटक मंडळे – संबंधीत मुख्याधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी (जिल्हा स्तर) तसेच विवाह निबंधक (महानगर पालिके मधील संबंधीत प्रभाग अधिकारी तसेच मुख्याधिकारी नगर पालिका/नगर परिषद/नगर पंचायत/कटक मंडळे यांना कळविण्यात येते की, आनंद विवाह नोंदणी आरोग्य विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शीख समाजाचे विवाह हे आनंद विवाह नोंदणी अंतर्गत नोंदविण्यासाठी या समाजाला अडचणी येणार नाहीत. शीख समाजाला विवाह नोंदणी केल्यामुळे शासकिय कायदेशिर फायदे मिळणे सुलभ होईल.

सर्व शीख समाजातील नागरिकांनी आनंद विवाह नोंदणी मध्ये विवाह नोंद करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा25 सप्टेंबरपासून शुभारंभ  नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान· नागरिकांना सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल मार्गदर्शन होणार

vishwatmaklokswamivarta

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश विशेष बाब म्हणून पुणे महानगरपालिकेत सामावून घेणार

मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ला प्राधान्य देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची माहितीआपत्कालीन प्रतिसादासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना तत्पर राहण्याच्या सूचना…

मेळघाट हाटमध्ये खादी महोत्सवाला सुरवात खादीचा वापर वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शिवसेना उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांच्या पाठपुराव्याला यश अखेर ३५ वर्षांची प्रतिक्षा संपली : बस गावात येताच जागोजागी वाहक वचालकाचा सत्कार -माहोरा ते जालना सेवा अखेर सुरु