vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद,एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद,एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले…

मुंबई, प्रतिनिधी: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांनी उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर तत्काळ एनडीआरएफच्या पथकाने धाव घेवून या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. याठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने नद्यांना प्रचंड पूर आला असून दरडी कोसळून वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत. उत्तराखंडमधील यमुनोत्री धामच्या जानकीचट्टी गावात २८ जूनपासून राज्यातील सुमारे १५० पर्यटक अडकून पडले होते. परतीच्या मार्गावर दरड कोसळून रस्ते वाहून गेल्याने त्यांना परत येता येत नव्हते. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून आठ दिवस लागण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात होती. तिथे अडकलेल्या पर्यटकांनी आपल्यापर्यंत मदत पाठवण्याची आणि आपल्याला सुखरूप ठिकाणी हलवण्याची विनंती महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्यांनी मदतीसाठी दिलेल्या सादेला तात्काळ प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या पर्यटकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. आज सकाळी त्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून या पर्यटकांना मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर काही वेळात मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशीही फोनवरून संवाद साधत त्यांनी राज्यातील पर्यटकांपर्यंत मदत पोहचवण्याची विनंती केली होती.

यानंतर तत्काळ एनडीआरएफची पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली. एनडीआरएफच्या जवानांनी यमुनोत्री धामच्या जानकीचट्टी गावात अडकलेल्या पर्यटकांना सुखरूपरित्या सुरक्षित ठिकाणी हलवले. या नंतर या पर्यटकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधत केलेल्या मदतीसाठी आभार मानले. तसेच आपल्याशी फोनवरून बोलल्यानंतर वेगाने चक्र फिरून अवघ्या काही तासात आपली सुटका झाल्याचे सांगत त्यांनी वेळीच मदत पोहचवल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.

०००

संबंधित पोस्ट

कुंभमेळा; जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन जारी,नागरिकांनी संपर्क करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

अभिजात मराठी भाषा सप्ताहः विश्वकोश मंडळातर्फे भूविज्ञान नोंद लेखन कार्यशाळा,जनसामान्यांना पृथ्वीविषयी सोप्या भाषेत माहिती द्या-डॉ.मिलिंद दुसाने

अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर-पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण 

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यशस्वी होण्यासाठी निरंतर वाचन आवश्यक- कुंडलिकराव अतकरे

vishwatmaklokswamivarta