vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती वाहनावर सुधारीत कर आकारणार

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती वाहनावर सुधारीत कर आकारणार

    जालना प्रतिनिधी : गृह विभाग यांच्या अधिसुचनेद्वारे मोटार वाहन कर सुधारणेसाठी तरतुद केल्याप्रमाणे दि. 1 जुलै 2025 पासून वाहनावर सुधारीत कर लागु करण्यात आले आहेत. वाहनावरील सध्या लागू असलेला कर व सुधारीत कर याविषयी खाली दिल्याप्रमाणे बदलेले आहेत.   सीएनजी किंवा एलपीजी वर चालणारी खाजगी संवर्गातील दुचाकी व चारचाकी वाहने यासाठी सध्या असलेला कर वाहनाची किंमत रुपये 10 लाखापर्यंत असेल तर सध्याचा कर 7 टक्के एवढा आहे यावर सुधारीत कर हा 8 टक्के आकारला जाईल. वाहनाची किंमत रुपये 20 लाखापर्यंत असेल तर सध्याचा कर 8 टक्के एवढा आहे यावर सुधारीत कर 9 टक्के आकारला जाईल. वाहनाची किंमत रुपये 20 लाखापेक्षा जास्त असल्यास सध्याचा कर 9 टक्के एवढा आहे यावर सुधारीत कर 10 टक्के इतका राहील. बॅटरीवर चालणारी मोटार वाहनासाठी जर वाहनाची किंमत 30 लाख रुपये पेक्षा अधिक असेल तर वाहनाच्या किंमतीच्या 6 टक्के इतका कर आकारला जाईल.      क्रेन्स कॉम्प्रेसर्स, प्रोजेक्टर्स किंवा खनित्रे यासारखी बांधकामाकरीता वापरली जाणारी कोणतीही मोटार वाहने यासाठी सध्याचा कर वाहनाच्या युडब्ल्यू किंवा जीव्हीडब्ल्यू वजनावर वार्षिक कर असतो सुधारीत कर मोटार वाहनाच्या किंमतीच्या 7 टक्के एकरकमी आकारला जाईल.

ओझे लादलेले असतांना ज्यांचे नोंदणीकृत वजन 7500 किलोग्रॅम अधिक नसेल अशी माल किंवा सामग्री यांची वाहतूकीकरीता वापरली जाणारी हलकी मालवाहतूक वाहने यासाठी सध्याचा कर वाहनाच्या युडब्ल्यू किंवा जीव्हीडब्ल्यूवजनावर वार्षिक कर असतो सुधारीत कर मोटार वाहनाच्या किंमतीच्या 7 टक्के एकरकमी आकारला जाईल.

वरील सर्व कर हे दि. 1 जुलै 2025 पासून लागू होत आहे. तरी सर्व वाहन धारक, वाहतूक संघटना यांनी वरीलप्रमाणे सुधारीत कराची नोंद घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-

संबंधित पोस्ट

ऑरिक स्मार्ट सिटीने औद्योगिक उत्कृष्टता आणि परिवर्तनाची सहा वर्षे केली साजरी विविध प्रकल्पांमुळे 71,343 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह, 62,405 रोजगारांचीही निर्मिती होणार बिडकिन औद्योगिक क्षेत्रात 49 सूक्ष्म – लघु आणि मध्यम उद्योग, 27 मोठे प्रकल्प आणि 4 बिगर सूक्ष्म – लघु आणि मध्यम उद्योगांना भूखंडांचे वाटप

vishwatmaklokswamivarta

नमुंमपामार्फत 27 मार्च रोजी प्रसिध्द पदभरती जाहिरातीतील पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत आता 19 मे 2025 पर्यंत

रासायनिक खताबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन

नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर-नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मंजुरी…

vishwatmaklokswamivarta

लघुलेखक (उच्चश्रेणी) लघुलेखक, लघु टंकलेखक पदांकरीता इच्छुक माजी सैनिक उमेदवारांनी समक्ष कार्यालयात भेट द्यावी

vishwatmaklokswamivarta

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 68 उमेदवारांची निवड