vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लखनौमध्ये दोन दहशतवाद्यांच्या अटकेनंतर एटीएसच्या दोन पथकांनी तातडीने कानपूर येथे अनेक भागात छापा.

 

लखनौमध्ये दोन दहशतवाद्यांच्या अटकेनंतर एटीएसच्या दोन पथकांनी तातडीने कानपूर येथे अनेक भागात छापा..

प्रतिनिधी,नवी दिल्ली – देशावरील कोरोनाचे संकट आता कमी होताना दिसत आहे, त्यातच दहशतवादी कारवायांनी पुन्हा डोके वर काढले आहे. मात्र, देशातील एटीएस आणि पोलीस दलाने कार्यतत्परतेनं दहशतवादी कारवायांचा कट उधळून लावला. एटीएसनेउत्तर प्रदेशमधील  काकोरी येथे 2 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. अल कायदा या दहशवादी संघटनेचे हे हस्तक असून सुसाईड बॉम्ब हल्ल्याचा त्यांचा डाव असल्याचे उघडकीस आलं आहे. यासंदर्भात यूपीचे एडीजी प्रशांत कुमार यांनी माहिती दिली.

दहशतवाद्यांने मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळले असून प्रेशर कुकर बॉम्बही सापडले आहेत. या कारवाईनंतर देशातील बर्‍याच राज्यात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या कारवायांवर एकप्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. लखनौमधील दहशतवाद्यांच्या अटकेच्या बातमीनंतर देशभरात सुरक्षेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरपासून   देशाच्या उर्वरित भागात सर्चऑपरेशन केले जात आहे. या दरम्यान दहशतवाद्यांचे कनेक्शन बांग्लादेशशी दिसून येत आहे. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालपर्यंत भारतीय सुरक्षा संस्था वेगाने या तपासात प्रगती करत आहेत.

संबंधित पोस्ट

शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे देणार; ५०० कोटी उत्पन्न मिळविण्याचे महामंडळाला उद्दिष्ट – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

रायगड हे केवळ पर्यटनस्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनावे-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह-छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन..

साई नगरी शिर्डी येथे भाजपचे राज्यस्तरीय महाअधिवेशन, केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा काय म्हणाले ते पहा-

vishwatmaklokswamivarta

बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांचा सत्कार करणे चुकीचे,गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय घेतला आणि या गुन्हेगारांची सुटका झाली

राज्यात ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध

राज्यात 27-28 डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज,खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी-हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेतीचे नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta